NobleBlocks

Research indexJournal article

भरतचय आरथक वकसमधय कष, औदयगक आण सव कषतरच यगदन

मोहनराव

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)6 Sep 2022Open access

NobleIDark:/48914/w1/20260521/84043BE9DOI10.5281/zenodo.7053772

Abstract

प्रस्तावना : जागतिक स्तरावर शेती उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक आहे. 2005 मध्ये भारताच्या एकूण उत्पन्नामध्ये शेती, लाकुड, जंगलसंपत्ती यांचा 18.6 टक्के वाटा होता. या व्यवसायामध्ये एकूण कामगारापैकी 60 टक्के कामगार काम करीत होते. तसेच राष्ट्रीय उत्पन्नात शेती उत्पन्नाचा वाटा सातत्याने वाढत आहे. म्हणूनच देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेती हा मोठा घटक आहे. भारताच्या आर्थिक विकासामध्ये शेती क्षेत्राची महत्वपूर्ण भूमिका आहे. म्हणूनच प्रत्येक पंचवार्षिक योजनामध्ये शेतीला नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना शेती व्यवसायाकरिता मोठया प्रमाणात कर्ज पुरवठा व अनुदान दिले जात आहे. आर्थिक सुविधा दिल्यामुळे हरीत क्रांती पासून शेती तंत्रज्ञान व सिंचन पध्दती मध्ये सातत्याने सुधारणा होत आहेत. या सुधारणामुळे 1950 पासून शेतीचे दर एकरी उत्पादन वाढत आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय शेती उत्पनाची तुलना केली तर भारतीय शेती उत्पादन क्षमता सर्वाधिक आहे. शेती उत्पादनात तेलबिया, ऊस, कापूस, तंबाखू, हळद, मसाल्याचे पदार्थ, कडधान्य फळबागायत, भाजीपाला, लाकुड, औषधी वनस्पती इत्यादीचे उत्पादन घेतले जात आहे. या उत्पादन प्रक्रियेमुळे मजूरवर्गाला मोठया प्रमाणात रोजगाराची सुविधा निर्माण झाली आहे. तसेच शेती व्यवसायाला अनुसरुन लघुउद्योगांची निर्मिती झाली आहे. एकंदरीत कृषी क्षेत्रामुळे आर्थिक विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळेच आर्थिक विकास प्रक्रिया गतीने घडून येत आहे. आर्थिक विकासामध्ये कृषी प्रमाणेच औद्योगिक क्षेत्राचा ही महत्वाचा वाटा आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report