NobleBlocks

Research indexJournal article

जगतक महमद आण भरतय शतकऱयच करजबजरपण(१९२९-१९३९): एक ऐतहसक अभयस

जाधव

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)19 Nov 2022Open access

NobleIDark:/48914/w1/20260521/A52BED92DOI10.5281/zenodo.7398838

Abstract

ऑक्टोबर, १९२९ मध्ये अमेरिकन शेअर मार्केट कोसळल्यानंतर जागतिक महामंदीची सुरुवात झाली. जगभरातील सर्व राष्ट्रे एकमेकांशी आंतरराष्ट्रीय संबंधाने जोडली गेली होती. शिवाय जागतिक अर्थव्यवस्था फारशी सुस्थिर नव्हती. त्यामुळे अमेरिकेतील महामंदीची लाट युरोपभर व त्यानंतर संपूर्ण जगभर पसरली. महामंदीमुळे वस्तूंच्या किंमती घसरून उत्पादन कमी झाले आणि बेरोजगारी वाढली. लोकांना पराकाष्टेच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. भारत अगोदरच जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडला गेला असल्यामुळे महामंदीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे अपरिहार्य होते. याकाळात भारतात फारसा औद्योगिक विकास झाला नसल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही कृषी उत्पादनावर अवलंबून होती. त्यामुळे भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेवर पर्यायाने शेतकऱ्यांवर या जागतिक महामंदीचा अधिक प्रभाव पडला.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report