NobleBlocks

Research indexJournal article

हदरबद मकत सगरममधय आरयसमज व वद परकश आरय यच करय

कुलकर्णी

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)13 Sep 2023Open access

NobleIDark:/48914/w1/20260516/7AB0C027DOI10.5281/zenodo.8332133

Abstract

हैद्राबाद मुक्ती संग्रामामध्ये आर्यसमाज व वेद प्रकाश आर्य यांचे कार्य श्री. रवींद्र कमलाकर कुलकर्णी संशोधक विद्यार्थी, वसंतदादा पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय पाटोदा, जिल्हा बीड ४१४२२० महाराष्ट्र, भारत Corresponding author E-mail : [email removed] Received: 10 September, 2023 | Accepted: 12 September, 2023 | Published: 13 September, 2023 --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- प्रस्तावना मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृत महोत्सव वर्ष आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील मराठवाडा हा पारतंत्र्यात होता. १७ सप्टेंबर १९४८ ला हा लढा पूर्ण होऊन भारतात हैदराबाद संस्थानातून मुक्त होऊन तो स्वतंत्र भारताचा भाग झाला. मराठवाड्याचा इतिहास बघितला तर हैदराबाद मध्ये दिल्लीचा सुभेदार निजाम- उल-मुल्क यांनी निजामशाही स्थापन केली होती. या प्रदेशात तीन भाषा बोलणारे लोक राहत होते. त्यामध्ये मराठी, तेलगु, कन्नड या भाषा बोलल्या जात होत्या. या काळात भाषेप्रमाणे त्या प्रदेशाची नावे झाली व त्यामधून मराठी भाषा बोलणाऱ्यांचा ‘मराठवाडा’ हे नाव पडले. मराठवाड्याचा इतिहास बघितला तर सातवाहन घराण्याची सत्ता या प्रदेशावर असलेली दिसते. कारण आज देखील सातवाहन कालीन नाणी आपल्याला या भागात मोठ्या प्रमाणात सापडतात. वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट इत्यादी घराण्यांची सत्ता या प्रदेशावर असलेली दिसते. आज मराठवाड्याचा विचार केला तर औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, जालना, परभणी या जिल्ह्यांचा समावेश या मराठवाड्यात होतो. या शोधनिबंधात आपण मराठवाडा मुक्ती संग्रामात आर्य समाज व वेद प्रकाश आर्य यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत. महत्वाचे शब्द: हैद्राबाद मुक्ती संग्राम, आर्यसमाज, वेद प्रकाश आर्य, हैदराबाद, विनायकराव कोरटकर, वैदिक संदेश, सत्यार्थ प्रकाश, निजाम शोध निबंधाची उद्दिष्टे हैद्राबाद मुक्ती संग्रामातील मराठवाड्यातील आर्य समाजाच्या योगदानाचा अभ्यास करणे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिली हुतात्मा वेद प्रकाश आर्य यांच्या कार्याचा आढावा घेणे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा विविध प्रकाश आर्य यांचे जीवन चरित्र अभ्यासणे. संशोधन पद्धती प्रस्तुत शोधनिबंधात दुय्यम् साधनाचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये विषयाशी संबंधित विविध पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मासिक, साप्ताहिक, इंटरनेट इत्यादीचा वापर करण्यात आला आहे. विषय विश्लेषण मराठवाडा मुक्ती संग्रामात वेगवेगळ्या संघटना, व्यक्ती सहभागी होत्या. या शोध निबंधात आपण आर्य समाज व या लढ्यातील पहिले हुतात्मा वेद प्रकाश आर्य यांची माहिती घेणार आहोत. आर्य समाजाची स्थापना मुंबई येथे १८७५ साली स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती यांचे कार्य भारतीय इतिहासात महत्त्वाचे आहे. वैदिक तत्त्वज्ञानाचे आचरण केल्याशिवाय या देशाला तरणोपाय नाही असे, ते म्हणत असत. व याच विचारांनी त्यांनी आर्यसमाजाची स्थापना केली. वैदिक धर्माचा प्रसार व प्रचार या सभेच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात केला. वैदिक धर्माच्या प्रसारामध्ये आर्य समाजाची योगदान मोठ्या प्रमाणात आहे. मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामात देखील आर्य समाजाचे योगदान, कार्य महत्त्वाचे आहे. हैदराबाद स्टेट मध्ये इसवी सन १९२० मध्ये आर्य समाजाची स्थापना झाली. या समाजाचा विस्तार तेलंगाना, कर्नाटक या भागाच्या तुलनेत मराठवाड्यात जास्त झाला. त्यामध्येही उस्मानाबाद व लातूर या भागामध्ये यांची संख्या जास्त प्रमाणात होती. हैदराबादचे विनायकराव कोरटकर हे आर्य समाजाचे अध्यक्ष होते. उदगीर येथे त्यांनी आर्य समाजाचे मुख्य कार्यालय उघडले. आर्य समाजाने ‘वैदिक संदेश’ या नावाचे वृत्तपत्र सोलापूर येथून प्रकाशित करण्यात सुरुवात केली. अत्यंत शिस्तप्रिय व ध्येयवादी संघटना म्हणून या संघटनेकडे पाहिले जात होते. सन १९३० ते १९४० या कालखंडात आर्य समाजाचे कार्य जोमाने सुरू होते. हे कार्य वाढत असल्याने निजाम सरकारने त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. ‘सत्यार्थ प्रकाश’ हा महत्त्वाचा ग्रंथ ज्याच्या हातात दिसेल त्याला निजाम पोलीस अटक करीत असत. निजामाच्या या कारवाईचा निषेध म्हणून गावोगावी तरुणांनी एकत्र येऊन आर्य समाजाच्या संघटनांची स्थापना केली. आर्य समाजातील विविध नेत्यांनी हिंदूंना एकत्र करून यांनी निजामाच्या विरोधात एकत्र येण्यास सुरुवात केली. अनेक गावात मंदिरे स्थापन केली. मुस्लिम धर्मप्रसाराविरोधात आर्य समाजाचे मोठे कार्य झालेले दिसून येते. या कार्यामुळे निजामांच्या धर्मांतर मोहिमेवर आळा बसलेला दिसून येतो. निजामाच्या अन्यायकारक धोरणाला आर्य समाजाने मोठ्या प्रमाणात विरोध केला. वेद प्रकाश आर्य यांचे बलिदान इसवी सन १९३० ते १९४० या काळात आर्य समाजाचे कार्य जोमाने वाढत होते. हिंदू समाजाला एकत्र करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू होते. सध्याच्या उमरगा तालुक्यातील ‘गुंजोटी’ हे गाव या काळात महत्त्वाचे केंद्र होते. ‘इत्तेहादुल मुस्लिम’ या एका जातीयवादी संघटनेला उत्तर म्हणून गुंजोटी या गावात तरुणांची एक संघटना निर्माण झाली. १९२७ साली गुंजोटी मध्ये श्रीकृष्ण पाठशाला, श्रीकृष्ण वाचनालय, व्यायाम शाळा यांची स्थापना करण्यात आली. इसवी सन १९३६ मध्ये गुंजोटी येथे आर्य समाजाची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, सत्संग, निर्भयवृत्ती, व्यायाम हे गुण तरुणांमध्ये आत्मसात करण्याचे काम केले. तरुणांचे मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रिकरण केले. या मराठवाडा मुक्ती संग्रामात पहिले बलिदान ‘वेद प्रकाश आर्य’ यांचे झाले. अवघ्या २० व्या वर्षी त्यांनी आपले बलिदान या लढ्यासाठी दिले. त्यांचे मूळ नाव दासप्पा बसप्पा हर्के असून त्यांचा जन्म १९३७ साली झाला. आर्य समाजाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात तरुणांना एकत्र करण्याचे काम सुरू केले होते. त्यामुळे निजामांचा रोष त्यांना पत्करावा लागणार होता. २३ फेब्रुवारी १९३७ या दिवशी भाई बन्सीलाल गुंजोटीला येणार म्हणून त्यांच्या स्वागताची मोठी तयारी सुरू झाली. आजूबाजूच्या परिसरातील सर्व तरुण यांच्या स्वागतासाठी एकत्र आले. पण या कार्यक्रमासाठी भाई बन्सीलाल येऊ शकले नाहीत, त्यामुळे सगळे एकत्र आलेले तरुण आपापल्या गावी परत गेले. भाई बन्सीलाल या कार्यक्रमासाठी आले नसल्यामुळे वेद प्रकाश आर्य हे संध्याकाळी गावी परत आले. पण गावातील इत्तेहादुल मुस्लिम या संघटनेला वेदप्रकाश आर्य यांच्या विरुद्ध आधीपासून चीड होती. सायंकाळी वेदप्रकाश २०० ते २५० अरबांच्या हाती पडले, ते एकटेच असल्यामुळे त्यांचे मुंडके छाटण्यात आले. अशा प्रकारे या लढ्यातील पहिले बलिदान या दिवशी झाले. त्यांच्या या बलिदानाने हा लढा अधिक तीव्र स्वरूपात लढला गेला, व १७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाडा स्वतंत्र झाला. निष्कर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामात आर्य समाजाचे योगदान मोठ्या प्रमाणात होते. या लढ्यातील पहिले बलिदान झालेल्या वेदप्रकाश आर्य यांचे योगदान मोठ्या प्रमाणात होते. या लढ्यात गुंजोटी या गावाचे योगदान महत्वाचे आहे. आर्य समाजाने लोकांना एकत्र करून हा लढा सर्व समावेशक बनविला. संदर्भ सूची डॉ. मोरवंचीकर रा. श्री. - सातवाहनकालीन महाराष्ट्र प्रा. डॉ. सोमनाथ रोडे - मराठवाड्याचा इतिहास, विद्या बुक्स जून १९९९ श्री. अनंत भालेराव - स्वामी रामानंद तीर्थ, N.B.T. १९८९ श्री. वसंत पोतदार - हैद्राबाद स्वातंत्र्यसंग्राम, विद्याभारती प्रकाशन लातूर २००६ डॉ. अनिल कठारे - मराठवाड्याचा इतिहास, कल्पना प्रकाशन, नांदेड १९९९

Discussion

Topics

More

Suggest a correction or report