Research indexJournal article
एन. ड. पटल एक समजभमख नततव
मुल्ला
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Aug 2023Open access
NobleIDark:/48914/w1/20260525/4A661102DOI10.5281/zenodo.8340584
एन. ड. पटल एक समजभमख नततव
मुल्ला · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2023
NobleIDark:/48914/w1/20260525/4A661102DOI10.5281/zenodo.8340584
Abstract
पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कष्टकरी सामाजिक चळवळीतील कार्याचा वटवृक्ष आणि शिक्षण प्रेमी नेते प्राध्यापक एन डी पाटील अशी ओळख असणाऱ्या या महान आदर्शवादी आणि तत्वनिष्ठ व्यक्तीमत्वाने आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर सर्वसामान्यांचे नेतृत्व करत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा हा लढवय्या नेत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे १५ जुलै १९२९ मध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या नारायण ज्ञानदेव पाटील यांना महाराष्ट्र 'एनडी सर' म्हणूनच ओळखत असे. कामगार, कष्टकऱ्यांवरील अन्यायाच्या विरोधात सतत संघर्षशील राहणे, याचे एनडींना व्यसनच होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य शेतकरी कष्टकरी व पुरोगामी चळवळीसाठी खर्च केले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत एन डी पाटील यांनी आपल्या समाजसेवेचा व राष्ट्र सेवेचा जो वसा घेतला होता तो जपण्याचा प्रयत्न केला समाजामध्ये अनेक प्रकारचे नेतृत्व उदयास येते आणि लयालाही जाते पण काही नेतृत्व असे असतात की त्यांना समाजाची दिव्य वलयांकित आधिसत्ता प्राप्त झालेली असते त्यातीलच एक दिव्य वलयंकित अधिकता प्राप्त असणारे जेष्ठ समाज सुधारक राजकारणी समाजकारणी व समाजाभिमुख नेतृत्व म्हणून एन डी पाटील संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्यांनी समाजकारण ,शिक्षण, सहकार, राजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये निस्वार्थ भावनेने प्रामाणिकपणे व नेटाने कार्य करून आपली वेगळीच ओळख व आपले वेगळेच नेतृत्व महाराष्ट्रामध्ये निर्माण केले त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनातील केलेल्या कार्यातूनच त्यांचे नेतृत्व गुण आपणास पहावयास मिळतात स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सांगण्यावरून; तसेच भाई दाजीबा देसाई यांच्या आग्रहामुळे एनडी शेतकरी कामगार पक्षात सक्रिय झाले व महाराष्ट्राला एक लढवय्या नेतृत्व मिळाले. सामाजिक सुधारणा व राष्ट्रीय स्वातंत्र्यांची चळवळ हे दोन प्रवाह इथल्या राजकीय सामाजिक जीवनात महत्त्वाचे होते. त्यामुळे त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यांचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते त्यावरच प्रकाश टाकण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे प्रस्तुत शोधनिबंधामध्ये एन डी पाटील यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेऊन त्यातून त्यांच्या नेतृत्वाची आधिमान्यता संपूर्ण जनमानसात कशी निर्माण झाली यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे