Research indexJournal article
महतम गधचय आरथक वचरच समरपकत
कडेकर
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)27 Oct 2023Open access
NobleIDark:/48914/w1/20260516/C5DB5830DOI10.5281/zenodo.10125710
महतम गधचय आरथक वचरच समरपकत
कडेकर · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2023
NobleIDark:/48914/w1/20260516/C5DB5830DOI10.5281/zenodo.10125710
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे एक जागतिक ख्यातीचे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी स्वतःचे आयुष्य हे मनुष्य सेवा व राष्ट्र सेवा यासाठी समर्पित केल्याचे दिसून येते. गांधीजींचा जन्म भारतात झालेला असल्यामुळे या भारतभूमीची सेवा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे असे त्यांचे मत होते. गांधीजींनी आपले विचार, कृती, चळवळी, संस्थांची निर्मिती आणि स्वतःची जीवनशैली या माध्यमातून राष्ट्र सेवेचे कार्य केले. त्यांचे जीवन हेच जगासाठी मोठा संदेश आहे. त्यांच्या विविधांगी सृजनशील कार्यांमध्ये प्रामुख्याने राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कार्यांचा समावेशहोतो. समाजाच्या आर्थिक कल्याणासाठी गांधीजींनी अनेक प्रकारचे कार्य केले. त्यांच्या मते, प्रत्येक व्यक्ती आणि राष्ट्रासाठी स्वयंपूर्णता ही आवश्यक बाब असते. या भूमिकेतूनच गांधीजींनी देशातील अनेक आर्थिक समस्यांचा अभ्यास केला आणि त्या समस्या सोडवण्यासाठी कृती-आराखडा तयार केला. यातच गांधीजींच्या आर्थिक विचारांचे मूळ सापडते. मानवी जीवनाचा बहुतांश भाग हा आर्थिक क्रियांमध्येच व्यस्त असतो याची जाणीव गांधीजींना होती. परंतु याबाबतीत नीतिमत्ता आणि अहिंसा या तत्त्वांना सोडून कोणतीही आर्थिक क्रिया असू नये अशी गांधीजींची धारणा होती. गांधीजींच्या विचारांवर रस्किन यांच्या 'Unto the Last' या ग्रंथाचा प्रभाव होता. त्याची प्रचिती आपल्याला गांधीवादी अर्थशास्त्रात येते. गांधीजींनी स्वतः अर्थतज्ञ असल्याचा कधीही दावा केला नाही किंवा ते अर्थशास्त्राचे विद्यार्थीही नव्हते. परंतु त्यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरतील अशा अनेक व्यावहारिक संकल्पना मांडल्या तेच पुढे गांधीजींचे आर्थिक विचार म्हणून अभ्यासले जाऊ लागले. त्याआधारे बरेच साहित्य निर्माण झाले, त्याला आधुनिक काळात 'गांधीवादी अर्थशास्त्र' असे संबोधले जाते.