Research indexBook chapter
महतम फल यचय सहतयतल चतनशलत
N. S. Girde
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 May 2024Open access
NobleIDark:/48914/w1/20260515/F94121C5DOI10.5281/zenodo.12516412
महतम फल यचय सहतयतल चतनशलत
N. S. Girde · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2024
NobleIDark:/48914/w1/20260515/F94121C5DOI10.5281/zenodo.12516412
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
महात्मा फुले यांच्या वाङ्मयाच्या अभ्यासात त्यांच्या व्यक्तित्वाच्या जडण - घडणेचा, त्यांचा सामाजिक जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोणाचा विचार केलेला आहे. महात्मा फुले यांच्या व्यक्तित्वाचा महत्वाचा आणि तेजस्वी पैलू म्हणजे त्यांची समाजचिंतशील वृत्ती हा होय. महात्मा फुले यांनी समाज परिवर्तनाची चळवळ उभी केली आणि त्यांनी समाजक्रांतीचा उद्घोष केला. त्यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य खर्ची घातले. महात्मा फुले यांच्या व्यक्तित्वाच्या जडण घडणेचा विचार करता त्यांच्या चिंतनशील वृत्तीला प्रत्यक्ष कृतीची जोड असल्याचे प्रत्ययास येते. चिंतन आणि कृती या वृत्तीतून महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात समाज क्रांतीची ज्योत पेटविली आणि तेवत ठेवली. महात्मा फुले यांच्या समाज आणि धर्मचिंतनाला, विचारांना बुद्धिप्रामाण्याचे अधिष्ठान होते. 'सार्जजनिक सत्यधर्मातून' त्यांच्या बुद्धि प्रामाण्याची साक्ष पटते. महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य आणि विचार मानवतावादी होते. महात्मा फुले तत्वनिष्ठ होते. आपल्या तत्वासाठी ते अर्हनिष संघर्ष करीत राहिले. तत्वनिष्ठा बाळगताना आणि तत्वाप्रमाणे वागताना येणाऱ्या प्रसंगांना त्यांनी खंबीरपणे तोंड दिले. छळ सहन केला पण आपले तत्व मात्र त्यांनी सोडले नाही.