NobleBlocks

Research indexJournal article

महरषटरतल शसकय वसतगहतल मलसठचय यजनच अधययन

गव्हाळे, गायकवाड

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 Oct 2024Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/51B076E8DOI10.5281/zenodo.14178481

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

गोषवारा – मागास व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या जीवनात वसतिगृहाला अतिशय मोलाचे स्थान आहे. सुरूवातीला केवळ वसतिगृहाच्या सोयीमुळे मुले-मुली शिक्षण प्रवाहात येण्यास सुरुवात झाली. मुले-मुली वसतिगृहालाच आपले घर मानतात. या वसतिगृहात काही मुला-मुलींचे भविष्य उज्वल झाले आहे. वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांना एकंदरीतच सर्वच स्तरावरील शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच वसतिगृहामुळेच विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय, महाविद्यालयीन शिक्षण घेवू लागले आहेत. एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार करता असे लक्षात येते की, वसतिगृहांमुळे विद्यार्थी शिक्षण प्रवाहात येण्यास मोठा हातभार लागला आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनात म्हणजे वसतिगृहांचा सिंहाचा वाटा आहे. वसतिगृहातील प्रवेश मर्यादित असल्याने पर्यायी सोयी सुविधा या अपुऱ्या असल्या कारणाने मुली शिक्षणापासून वंचीत राहतात. वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या कुटूंबातील सदस्य हे अजूनही जाती-रूढी परंपरा यांच्यात अडकलेले असल्याने मुलींच्या शिक्षणाचा गांभीर्याने विचार होत नाही

Discussion

Topics

More

Suggest a correction or report