NobleBlocks

Research indexBook chapter

शशवत वकससठ नवनयपरण ततरजञन

चव्हाण

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)28 Feb 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/BDBC6870DOI10.5281/zenodo.15307732

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

गोषवारा सद्यस्थितीत जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास,प्रदूषण यासारख्या गंभीर पर्यावरणीय समस्या मानवासमोर उभ्या असून मानव जातीमध्ये अस्तित्वासाठी अस्थिरता निर्माण होत आहे. मानवाने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली असून नाविन्यपूर्ण उपाय समोर येऊ लागले आहेत.शाश्वत विकासासाठी हरित तंत्रज्ञानाबरोबरच अक्षय उर्जेसारख्या नूतनीकरणक्षम ऊर्जेचे प्रगत तंत्रज्ञान पर्यावरणाशी संवाद साधण्यात यशस्वी ठरत आहे.सौरऊर्जा,पवन ऊर्जा, जलविद्युत यासारख्या स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानातील प्रगती जीवाश्म इंधनाना अक्षय ऊर्जेसारखे नूतनीकरणक्षम ऊर्जेचे पर्याय देत आहेत. त्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जन कमी होऊ शकते.शाश्वत विकासामध्ये स्मार्ट सिटी सारखी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उदयास येणारी शहरे जीवनाच्या प्रत्येक घटकांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत. तंत्रज्ञानामध्ये शाश्वत विकास आणि हवामान कृतींना गती देण्याची अफाट क्षमता असून पर्यावरणीय व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मानवी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड मिळणे आवश्यक आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report