NobleBlocks

Research indexJournal article

मधयमक सतरवर अधययन-अधयपनत सगणकच वपर करन कतशलत वढवण- एक अभयस

पाचंगे, कदम

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)28 Feb 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260515/0311A256DOI10.5281/zenodo.14992334

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

सारांश: प्राथमिक स्तर किंवा माध्यमिक स्तर या दोन्ही स्तरावर विद्यार्थ्यांना जितक्या जास्त प्रमाणात अध्ययन अनुभूती दिली जातात तितक्याच जास्त प्रमाणात त्यांचे ज्ञान अधिक प्रगल्भ होते. शिक्षणाचे सुव्यवस्थित व्यवस्थापन करणे म्हणजे शिक्षणात अधिक प्रमाणात अध्ययन अनुभूती देणे होय. शिक्षणातील डिजिटल तंत्रज्ञानाचा सर्वात प्रमुख वापर म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (LMS) च्या रूपात प्राप्त होते. हे केंद्रीकृत व्यासपीठाद्वारे शैक्षणिक संसाधने आणि सामग्रीचे प्रशासन सुलभ करतात. या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करून, अध्यापन आणि शिकण्याची प्रक्रिया अनुकूल केली जाते. विद्यार्थ्यांना विवध विषय, माहिती व तंत्रज्ञान, संगणक आणि मैदानी खेळ या सर्वांच्या माध्यामतून सर्वांगीण विकास करणे होय. बौद्धिक, शारीरिक, मानसिक स्वरूपाचा विकास केल्याने विद्यार्थी आज या स्पर्धेच्या युगात टिकू शकतो, तग धरू शकतो. संगणक किंवा तंत्रज्ञान हे शिक्षण शैलींमधील विविधता समजून घेण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे . हे सहकार्याला प्रोत्साहन देते आणि वर्गमित्रांना एकमेकांशी अधिक संवाद साधण्यास सक्षम करते. या विषयात येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी विद्यार्थी एकमेकांना अनेक प्रश्न विचारतात व याच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये शैक्षणिक संवाद निर्माण होण्यास मदत होते. तंत्रज्ञान शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना वास्तविक जगाचा सामना करण्यासाठी, स्पर्धेत टिकण्यासाठी तयार करण्यास मदत करते. यामुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती जलद आणि सोप्या पद्धतीने मिळू शकते. संगणकाचा वापर करून क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीने मांडता येतात. त्यामुळे संगणकाचा वापर केल्याने अध्यन अध्यापन प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होते.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report