Research indexJournal article
१९ वय शतकतल ड. रखमबई रऊत यच जवन व करय : समजशसतरय दषटकनतन वशलषण
इंगोले
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)5 Oct 2024Open access
NobleIDark:/48914/w1/20260522/15451764DOI10.5281/zenodo.13856037
१९ वय शतकतल ड. रखमबई रऊत यच जवन व करय : समजशसतरय दषटकनतन वशलषण
इंगोले · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2024
NobleIDark:/48914/w1/20260522/15451764DOI10.5281/zenodo.13856037
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
सारांश : भारतीय समाजात जातीय व्यवस्था आणि धर्मव्यवस्था कायम राहण्यासाठी स्त्रियांवरील बंधनाची पकड मजबूत केली आहे. पण हे केवळ भारतातच होते असे नाही तर संपूर्ण जगात ही परिस्थिती आहे.आपले हितसंबंध आणि स्वार्थ जपण्यासाठी प्रत्येक जाती-जमातीने,धर्माने स्त्रियांचा दुरुपयोग केलेला आहे . स्त्रियांना चौकटीत बंदिस्त केले आहे आणि स्त्रियांच्या बंदिस्तपणावर आधारित समाजाची चौकट विस्तारित केली आहे.समाजाच्या उभारणीसाठी स्त्रियांना पायाखालील दगड बनविण्यात आले आहे . त्यांना त्याच स्थितीमध्ये बंदिस्त ठेवण्यासाठी स्त्रियांच्या संदर्भात पुरुषांपेक्षा वेगळे विशिष्ट सामाजिक प्रमाणके आणि मुल्ये निर्माण केले.मानव केंद्रित समानता पुरस्कृत व्यवस्थेला निर्माण होण्यासाठी पूरक आणि पोषक वातावरण नाकारले आहे.स्त्रियांनी माणुस म्हणुन पुरुषां समान जगणे स्विकारले आणि आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा प्रत्यय जगाला आणून दिला तर समाजाची ही इमारत गडगडणारच अशी विचित्र कोंडी आहे.२१ व्या शतकातील ही सामाजिक स्थिती आहे.