Research indexBook chapter
ड. बबसहब आबडकरच शकषणवषयक वचर व करय
मोरे
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)14 Apr 2025Open access
ड. बबसहब आबडकरच शकषणवषयक वचर व करय
मोरे · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रास्ताविक : भारतीय भूमीवर अनेक समाजसुधारक तत्वचिंतक, संत, महंत, यांनी जन्म घेऊन मानवकल्याणासाठी आयुष्य वेचले अशा समाजोध्दारकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अग्रस्थानी येते. तत्कालिन समाजातील अस्पृश्यांच्या घरी जन्म घेऊन, जीवनात हाल-अपेष्टा सहन करून, उच्च विद्याविभुषित झालेल्या, जीवनभर अस्पृश्यतेचे चटके सहन करून तमाम देशवासिंयांना त्यांचे हक्क मिळवून देणारे व जगभरात ज्ञानाचे प्रतिक ठरलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगन्मान्य विद्वान होते. आपल्या विचार व कार्याने त्यांनी आपलया देशातील हजारो वर्षांपासून धर्मसत्तेने गुलाम बनवून, माणूसपणाचे हक्क हिरावून घेतलेल्या शोषित, बहिष्कृत, पिडित देशबांधवांनाअज्ञान, अंध:कार , रूढी-परंपरांच्या दास्यातून बाहेर काढून नवा सर्व समाजघटकांना सामावून घेणारा लोकशाहीचा राजमार्ग दाखवला, व निसर्गाने सर्वांना समान अधिकार दिलेले असताना, माणूस म्हणून सर्वजण सारखेच असताना उच्चवर्णियांनी त्यांच्या सोईसाठी निर्माण केलेल्या जातीपातीच्या, उच्चनिचतेच्या, काही विशिष्ठ वर्ग सोडून इतरांना कमी लेखणाऱ्या जातीयतेच्या उतरंडीला कायद्याच्या आधारे सुरूंग लावला. त्यांचे कार्य केवळ कायदेविषयकच नव्हते तर ते जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ, कायदेपंडित होते. त्यांनी देशातील सर्व कष्टकरी, कामगार, दीनदलित, शोषित, पिडीत, स्त्रीया, आदिवासी, अस्पृश्य, भटके यां सर्वांसाठी उत्त्प्रेरकाचे कार्य केले. शिक्षण, सिंचन, परराष्ट्र धोरण, भाषावार प्रांतरचना, भाषाविषयक दृष्टीकोन, समाजकारण, वृत्तपत्र, अर्थकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्राते केलेले त्यांचे कार्य समस्त भारतवासियांना आजही उद्बोधक मार्गदर्शक आहे. प्रस्तुत शोधनिबंधातून त्यांच्या शिक्षणविषयक विचार व कार्याचा आढावा घेताना त्यांच्या कार्याचा मागोवा घेणे क्रमप्राप्त ठरते.