Research indexBook chapter
ड बबसहब आबडकर : शकषणक वचर
बताले
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)14 Apr 2025Open access
ड बबसहब आबडकर : शकषणक वचर
बताले · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रस्तावना: एक महान तत्त्वचिंतक, बुद्धिप्रामाण्यवादी नेते आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे युगपुरुष अशी जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आहे. समग्र आयुष्यभर त्यांनी जोपासलेली तत्त्वनिष्ठा आणि भारतीय. समाजक्रांतीप्रती त्यांनी बाळगलेली प्रतारणाविहीन कार्यनिष्ठा ही त्यांच्या महापरिनिर्वाणापश्चातच्या अनेक राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक चळवळींना प्रेरणास्वरूप राहिली आहे. धर्म, समाज आणि संस्कृतीची कठोर आणि तर्कनिष्ठ चिकित्सा करून त्यांनी भारतीय समाजजीवनातल्या प्रतिगामी रूढी-परंपरांना, विषमता आणि शोषणाला विरोध करून समतेचे तत्त्व रुजविण्याचा प्रयत्न केला. भारताला लोकशाहीवादी देश करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समग्र आयुष्यभर केलेल्या कार्यामुळे सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. चातुर्वर्ष्यावर आधारित विषमतापूर्ण व्यवस्थेचे उच्चाटन झाले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एका विशिष्ट वर्गाचे वर्चस्व संपुष्टात येऊन सर्वसामान्यांना समान हक्क मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय उपखंडातील शोषितांच्या समग्र मुक्तिसाठी अखंडपणे ज्ञानसाधना केली. प्रत्यक्ष राजकीय, सामाजिक चळवळीची कास न सोडता या चळवळीला पोषक अशी वैचारिक ज्ञानसंपदा निर्माण करणारे ते भारतीय राजकारणातील अपवादात्मक उदाहरण आहे. त्यांनी समताधिष्ठित जातीविहीन समाजव्यवस्थेचे स्वप्न पाहिले. त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आज अनेक दशकांनंतरही महत्त्वाचा वाटतो आहे.