NobleBlocks

Research indexJournal article

ई - परशसन आधनक शसनच गरज

बांगर

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)10 Feb 2023Open access

NobleIDark:/48914/w1/20260522/87E4970ADOI10.5281/zenodo.7751335

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

एकविसावे शतक हे विज्ञान तंत्रज्ञान व संगणक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रचार व प्रसारामुळे जगात अनेक क्षेत्रात क्रांतीकारी बदल झालेले आहेत. प्रशासकिय कार्य व प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अदयावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे बदल होत असलेले दिसून येत आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्ति आपलया देनंदिन अडचणी, समस्या, शासन व प्रशासन यंत्रणेने त्वरीत सोडवाव्यात अशी अपेक्षा करतो या करिता संगणकाच्या क्रांतीमुळे प्रशासकिय यंत्रणेत आमुलाग्र परिवर्तन करणे अनिवार्य ठरले. गरीबातल्या गरीब माणसापर्यंत • विकासाचे लाभ पोहोचले पाहिजेत. शिवाय ते टिकाऊ असले पाहिजेत हे प्रशासन जितके कार्यक्षम, जबाबदार व दक्ष असेल तेवढा देशाचा वेगाने विकास होऊ शकेल. म्हणजेच प्रशासन थेट सामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजे. हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आधुनिक काळात ई-प्रशासनाची संकल्पना उदयास आली. जगभरातील ई-प्रशासन संकल्पनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणाच्या सुलभ सेवाप्राप्ती, वेळेची बचत, पारदर्शकता, अचूकता आणि तत्परता यासारख्या नवगुणांचा शासन व प्रशासन यंत्रणेचा अंतर्भाव होत आहे. कोणत्याही सरकारी योजनांचे लाभार्थी किंवा अन्य नागरिकांना तत्पर सेवा देण्याच्या दृष्टीने ई-प्रशासन ही काळाची गरज बनली आहे. म्हणजेच ई-प्रशासन सरकार व जनता यातील महत्वाचा दुवा ठरला आहे. यामुळे प्रशासनापासून मध्यस्थ व दलालांचा प्रभाव कमी झाला आहे. आजच्या काळात ई-प्रशासनाचे महत्व वाढत चालले आहे. जगभरातील अर्थव्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचे महत्व पटले आहे व आर्थिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी हे तंत्रज्ञान संप्रेरक ठरलं आहे. सदरील शोधनिबंधामध्ये ती प्रशासनाच्या पार्श्वभूमीचा तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या प्रशासनाकडून ई सेवांचा अभ्यास करण्यात आला आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report