Research indexJournal article
जनरक औषध आण वपणन
घायाळ
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 Oct 2023Open access
NobleIDark:/48914/w1/20260523/96195D7CDOI10.5281/zenodo.10337253
जनरक औषध आण वपणन
घायाळ · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2023
NobleIDark:/48914/w1/20260523/96195D7CDOI10.5281/zenodo.10337253
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रस्तावना आजच्या जागतिकीकरणाच्या युगात वस्तू व सेवांच्या सर्वच क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. वस्तू व सेवांच्या सर्वच क्षेत्र विकसित होत असून त्यासोबत बाजारपेठेचे स्वरूप सुद्धा बदलत आहे. आज बाजारपेठेत अनेक वस्तू च्या पर्यायी वस्तू असून योग्य दरात ह्या वस्तू उपलब्ध होत आहेत. यामधील मानवी आरोग्य संदर्भातील औषधी बाजारपेठ खुप महत्वाची आहेत, कारण औषधींवर होणारा खर्च खूप जास्त असतो कारण ग्राहकाला ह्या वस्तू घेणे गरजेचे असते, त्यामुळे यासाठी ग्राहक जास्त किंमत देण्यासाठी तयार होतो. ग्राहकांना कमी किमतीत योग्य औषधी मिळावी या उद्देशाने जेनेरिक औषधी बाजारपेठ याचा विचार समोर आला.जेनेरिक औषधे ही अशी असतात ज्यांचे स्वतःचे ब्रँड नाव नसते आणि बाजारात फक्त त्यांच्या जेनेरिक नावाने ओळखले जातात. जरी काही औषधांची ब्रँड नावे असली तरी ती खूप स्वस्त आहेत आणि जेनेरिक औषधांच्या श्रेणीत येतात. जेनेरिक औषधांबाबत सर्वसामान्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. जेनेरिक औषधांच्या कमी किमतीमुळे त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि तज्ञांचे मत आहे की जेनेरिक औषधांबद्दल लोकांचे गैरसमज दूर करण्याची गरज आहे. कारण ते स्वस्त आणि प्रभावी दोन्ही आह यामुळे ग्राहकांना आर्थिक फायदा होऊ शकतो.