Research indexJournal article
महतम गधच सतय व अहस सकलपन
दशरथ
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)27 Oct 2023Open access
NobleIDark:/48914/w1/20260515/F15CD999DOI10.5281/zenodo.10128244
महतम गधच सतय व अहस सकलपन
दशरथ · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2023
NobleIDark:/48914/w1/20260515/F15CD999DOI10.5281/zenodo.10128244
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
कोणत्याही सत्पुरुषाचे त्याच्याच जीवंतपणी मूल्यांकन करणे व इतिहासातिल त्याचे स्थान ठरवणे सोपी गोष्ट नसते गांधीजी एकदा म्हणाले होते माणसाच्या सुखाविषयी त्यांच्या जिवंतपणी निर्णय घेणे कठीण झाले होते सत्य .... काय आहे ? हा एक कठीण प्रश्न आहे. परंतु तुझ्या आतील आवाज जे सांगेल ते सत्य आहे. असे म्हणून माझ्यापुरता हा प्रश्न मी सोडवला आहे तुम्ही विचार कराल कि मग वेगवेगळ्या लोकांचे सत्य वेगवेगळे का ? कारण, असे कि मानवी मन असंख्य माध्यमांतून काम करत असल्यामुळे आणि सर्व लोकांचा मानसिक विकास एकाच गतीने होत नसल्यामुळे एक व्यक्तीकरीत जे सत्य असते, ते दुसऱ्या व्यक्ती करीत असत्या असू शकते त्यामुळे ज्यांनी हे प्रयोग केले आहेत ते या निष्कर्षावर पोहचले आहेत कि, हे प्रयोग करताना काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे. अगदी नम्रतापूर्वक मी तुम्हाला सांगू इच्छितो कि ज्या व्यक्ती मध्ये भरपूर नम्रता नसेल, त्याला सत्याचा शोध लागू शकत नाही. तुम्हाला सत्यसागरात पोहायचे असेल तर तुम्ही स्वतःला शून्यवत केले पाहिजे. मी स्वतःला एक व्यावहारिक आदर्शवादी मानतो. अहिंसा धर्म केवळ ऋषीमुनींकरीता नाही. ज्या प्रमाणे हिंसा पशूचा नियम आहे, त्याच प्रमाणे अहिंसा मानवाचा नियम आहे. पशुचा आतमा सुप्त अवस्थेत असतो व त्याला केवळ शारिरीक नियम कळतात. माणसाची प्रतिष्ठा एक उच्चतर नियमाचे - आत्मशक्तीच्या नियमाचे - पालन करण्याची अपेश्या असते जा ऋषींनी हिंसेच्या वातावरणात अहिंसेचा शोध लावला, ते न्यूटनपेक्षाही अधिक प्रतिभाशाली होते. वेलिंग्टनपेक्षाही मोठे योद्धे होते. शात्राच्या प्रयोगाचे ज्ञान असल्या नंतरही त्यांनी त्यांची निरुपयोगिता ओळखली व तुमची मुक्ती हिंसेत नाहीतर अहिंसेच्या आहे. असे त्यांनी जगाला सांगितले. एकदा व्हाईस रॉय लार्ड कर्झन म्हणाला कि सत्य हि संकल्पना युरोपमधून भारतमध्ये आली. या वर गांधीजी संतप्त झाले व ते म्हणले, तुमचा विचार चुकीचा आहे भारतमध्ये सत्याची प्रतिष्ठा प्राचीन काळापासून आहे. सत्याला परमात्म्याचे रूप मानले जाते. अहिंसेला साधन म्हणून ठेऊन आपण अंतिम सत्याची प्राप्ती करू शकतो गांधींनीं त्यांच्या आदर्श समाजाची व्याख्या " रामराज्य " अशी केली. हा एक समाज म्हणून कल्पित आहे जिथे सत्याचा विजय होतो, लोक नैतिक आणि अध्यात्मित जीवन जगतात आणि नाहीसे होतात. अशा या राष्ट्रपित्याचा जन्म इ. सन २ ऑक्टोबर १८६९ मध्ये पोरबंदर गुजरात येथे झाला आणि त्यांचा मृत्यू ३० जानेवारी १९४८ मध्ये दिल्ली येथे झाला. ते राष्ट्रपिता, भारतीय वकील, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते. ते ब्रिटिशाविरुद्ध राष्ट्रवादी चळवळीचे नेते होते.