Research indexJournal article
वकरमगड तलकयतल आदवस महल बचत गट आण सतरयच आरथक सकषमत एक अवलकन
Talekar
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)20 Apr 2024Open access
NobleIDark:/48914/w1/20260523/55C29DBCDOI10.5281/zenodo.11260147
वकरमगड तलकयतल आदवस महल बचत गट आण सतरयच आरथक सकषमत एक अवलकन
Talekar · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2024
NobleIDark:/48914/w1/20260523/55C29DBCDOI10.5281/zenodo.11260147
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रस्तुत संशोधनामध्ये विक्रमगड तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटांचा अभ्यास केला जाणार असून, या अभ्यासाच्या माध्यमातून आदिवासी महिलांची आर्थिक सक्षमता कशी आहे, या सक्षमतेसाठी बचत गट उपयोगी आहेत का? बचत गटामुळे विशेषतः आदिवासी महिलांच्या आर्थिक जीवनात काही बदल झाले आहेत का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न या संशोधनातून केला जाणार आहे. आदिवासी महिलांच्या आर्थिक जीवनात,त्यांच्या दररोजच्या व्यवहारात व दैनंदिन जीवनात बचत गटाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याची दिसून आलेले आहे.जो आदिवासी बांधव आपल्या कुटुंबाकरिता उन्हातानात जीवाचं रान करतो,त्या कुटुंबाची गृहिणी ही बचत गटाच्या माध्यमातून आपलं दररोज जीवन सुखकर होण्याकरिता, बचत गटाचा आधार घेत असते,हे संशोधकाला निदर्शनास आले असून, बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनमानाला हातभार लागलेला आहे,तसेच आर्थिक सक्षमता काही अंशी प्रमाणात का होईना,त्यांना प्राप्त झालेली आहे, याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बचत गटाची क्रियाशीलता आणि बचत गटाची कार्यशैली दिसते. आदिवासी महिला बचत गट हे त्यांच्या जीवनाचाच एक भाग बनलेले आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून अनेक शासकीय योजना व विविध सामाजिक संस्थांच्या मिळणाऱ्या योजना बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवत आहेत. याच्या माध्यमातून देखील आदिवासी महिलांची आर्थिक सक्षमता होण्याकरिता मदत झालेली आहे. या सर्वांची पार्श्वभूमी ही बचत गटापासूनच सुरू होते, म्हणजेच आदिवासी कुटुंबाच्या विशेषतः आदिवासी महिलांच्या आर्थिक उन्नती मध्ये बचत गटाची भूमिका ही खूप भरीव आहे, असं या संशोधनाच्या माध्यमातून मांडले जाणार आहे.