Research indexBook chapter
नदड शहरतल नगरकरणच वढत वग
आढाव, वाघमारे
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Aug 2024Open access
NobleIDark:/48914/w1/20260521/8857E854DOI10.5281/zenodo.13923101
नदड शहरतल नगरकरणच वढत वग
आढाव, वाघमारे · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2024
NobleIDark:/48914/w1/20260521/8857E854DOI10.5281/zenodo.13923101
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
सारांश : अति प्राचीन काळापासून भारतामध्ये नगरे अस्तित्वात होती परंतु नागरिकरण प्रक्रिया हे औद्योगीकरणाचे अपत्य असल्यामुळे 19 व्या शतकापासून औद्योगीकरणाबरोबरच नागरीकरण देखील वेगाने होत आहे.औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगधंदे ,व्यापार, दळणवळण यांच्या विकासातून नागरीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतलेला आहे. एखादे ठिकाण उद्योगधंदे ,व्यापार व दळणवळणांचे आर्थिक केंद्र बनते.त्या ठिकाणी प्रशासन, शिक्षण, आरोग्य व मनोरंजनाच्या व इतर सोयीसुविधांच्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.त्यामुळे लोकांचे शहराकडचे आकर्षण वाढते आणि लोक शहराकडे स्थलांतर करतात.त्यातून नागरीकरण प्रक्रियेला सुरुवात होते. नांदेड जिल्ह्यातील एकूण नागरी लोकसंख्येपैकी शहरनिहाय लोकसंख्या प्रमाणात नांदेड शहरात सन 1971 ते 2021 या 50 वर्षाच्या काळात 5.55% नी वाढ झालेली दिसून येते. नांदेड जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी नांदेड शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात सन 1951 ते 2021 या 70 वर्षाच्या काळात 10.12%नी वाढ झालेली दिसून येते.ही वाढ दिसून येण्यामागचे कारण म्हणजे.नांदेड शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.तसेच शहरालगत विष्णुपुरी धरण हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प येथे आहे.शैक्षणिक दृष्ट्या शहराला विशेष असे महत्त्व आहे. शहरांतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे.उच्च व तंत्र शिक्षण महाविद्यालय शहराअंतर्गत आहेत. तसेच आर्थिक सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक असा भक्कम पाया लाभलेले शहर असल्यामुळे अनेक भाविकांचे पर्यटकांचे तसेच ग्रामीण भागातील जनतेचे शहराकडचे आकर्षण वाढत आहे.