NobleBlocks

Research indexJournal article

महल सकषमकरण यजन : आढव

दिकोंडा

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)28 Feb 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260524/BCCB157FDOI10.5281/zenodo.15222403

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

घोषवारा:- महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना आर्थिक,सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम बनविणे होय. यासाठी महिलांना प्रथम साक्षर करणे आणि अर्थाजन करण्यासाठी उपयुक्त असे व्यवसाय शिक्षण देणे हा महत्त्वाचा उपाय आहे. सध्या २०२१ मध्ये देशात महिला साक्षरता साधारणता ७२ टक्के आहे. महिलांना अशा प्रकारे सक्षमीकरणासाठी शिक्षण द्यावे की ज्यामुळे त्यांना नोकरी मिळेल आणि वेतनही अधिक मिळेल. केंद्र व राज्य शासनाकडून महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना राबवण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे महिलांना त्यांच्या पायावर उभे राहावे व कुटुंबाची जबाबदारी व इतर मूलभूत गरजा त्यांना स्वतः भागवता येतील महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वावलंबी बनविणे सक्षमीकरणाला चालना देणे. हा शासनाचा विविध योजना राबविण्याचा मुख्य उद्देश आहे. पारंपारिक विचार केला तर मुलींना समाजात कमी मान दिला जातो. लहानपणापासून त्यांच्यावर दबाव टाकला जातो. घराबाहेर पाठवले जात नाही. त्यांना सुद्धा पुरुषां इतका सन्मान मिळावा. या हेतूनेच महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. यापैकी काही योजना फक्त महिलांसाठीच राबविल्या जात असून यामध्ये महिला कर्ज, बचत गट, गृह उद्योग स्वयंरोजगार इत्यादी योजनांचा समावेश आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी व्यवसायात पुढाकार घेण्यासाठी व आर्थिक दर्जा वाढवण्यासाठी महिलांना या विविध योजनांचा नक्कीच फायदा होणार आहे तसं पाहायचं झालं तर महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राज्य व केंद्र शासनाकडून राबविण्यात येतात. ज्यामध्ये महिलांना व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या योजना, महिलांना व्यवसायासाठी उपकरण किंवा वस्तू देणारे योजना, महिलांना प्रवासात सूट देणाऱ्या योजना, महिलांना प्रसूती पश्चात लाभ देणारी योजना, मुलींना लाभ देणाऱ्या योजना, गर्भवती महिलांसाठी योजना, इत्यादी योजनांचा समावेश आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report