NobleBlocks

Research indexJournal article

महतम गध यच चपरणयतल सतयगरह

वामनराव

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)27 Oct 2023Open access

NobleIDark:/48914/w1/20260524/3225328DDOI10.5281/zenodo.10130258

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

"संपूर्ण विश्वात हिंसा, हुकूमशाही, लालसा आणि भौतिकतेमुळे ताणतणाव ज्या प्रमाणात वाढत राहतील, त्याच वेगाने : किंबहुना अधिकाधिक गती मानपणे विश्वभरात महात्मा गांधीजींचे विचार, कार्य आणि जीवन संदेश विशेषता: युवा पिढीत संस्कारीत व्हावेत, हीच अंतरिक सद्भावना." डॉ. भवरलालजी जैन एक सर्वसामान्य माणूस आपल्या जीवनामधील असामान्य प्रयत्नाने अनेक प्रकारे उंची गाठू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधीजींचे एकंदरीत जीवन होये.महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला होता. त्यांचे मूळ नाव मोहनदास करमचंद गांधीअसे होते.लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत.आज संपूर्ण विश्वात भारताची ओळख ही महात्मा गांधींच्या नावाने होते. भारतात महात्मा गांधी यांचे नाव माहित नाही असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही. ब्रिटिश सत्तेच्या अनेक वर्षाच्या जोखडा तून भारतीयांची मुक्तता करण्याचे महान कार्य महात्मा गांधी यांनी केले. या स्वतंत्र आंदोलनामध्ये सर्वसामान्यांना सहभागी करून घेत ब्रिटिशांविरुद्ध जो महात्मा गांधींनी लढा उभारला, या लढ्याला सत्य,अहिंसा या नैतिक मूल्याची जोड देऊन एक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यामुळेच आज त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणूनओळखल्या जाते. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बिहार जिल्ह्यातील चंपारण्य येथे सर्वप्रथम जो लढा उभारला त्याविषयी प्रस्तुत शोधनिबंधातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report