Research indexBook chapter
कल परम ड.बबसहब आबडकर
माने
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)14 Apr 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20261005/330293A1DOI10.5281/zenodo.15469659
कल परम ड.बबसहब आबडकर
माने · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20261005/330293A1DOI10.5281/zenodo.15469659
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रस्तावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी होते एक अर्थतज्ञ पत्रकार राजनीति तज्ञ अर्थतज्ञ आणि भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतोस मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कला प्रेम देखील सर्वश्रूत आहे. चित्र, शिल्प, संगीत, साहित्य अशा सर्वच कला आज बाबासाहेबांना आपला अनन्य विषय मानतात. पण बाबासाहेबांनी या सर्वच कलांवर उत्कट प्रेम केले. कला नवनिर्मितीच करतात. या कलांवर प्रेम करून बाबासाहेब स्वत:तील युगनिर्माता जन्माला घालत होते. प्रत्येक माणसात कलेची आवड असतेच पण भारतात चातुर्वर्ण्याने लोकांच्या कलाभिरुचीचे अपहरणच केले आहे. पाश्चात्त्य जगाने असे केले नाही. चित्रकलेची त्यांना विशेष आवड होती. माडगूळकरांच्या कडून ते चित्रकला शिकले होते. चित्र काढताना ते देहभान विसरत असत. अजिंठ्यातील जनपदकल्याणी या काळ्या राणीचे चित्र त्यांना खूप आवडायचे. अविवाहित असतो तर हिच्याशीच लग्न केले असते असे ते एकदा गमतीने म्हणाले होते. आयुष्याच्या शेवटी त्यांनी त्यांना हवे तसे बुद्धाचे उघड्या डोळ्यांचे चित्र काढले होते. ‘लाइट ऑफ द वर्ल्ड’ असे त्याखाली लिहिले होते. शिल्पकलेचाही नाद त्यांना होता आणि मिलिंद महाविद्यालयाच्या पुढल्या बागेत बसवण्यासाठी बुद्धांचा पुतळाही त्यांनी तयार केला होता. हे प्रज्ञानाच्या हिमालयाचे कलाप्रेम होते. संगीताचीही त्यांना विशेष रुची होती. नाट्यगीते त्यांना विशेष आवडत. पुण्यावरून मास्टर कृष्णरावांना बोलावून घेत आणि त्यांच्या नाट्यगीत गायनात ते तल्लीन होत. बाळ साठे या व्हायोलिन तज्ज्ञाकडून त्यांनी व्हायोलिन शिकण्याचा महिनाभर प्रयत्न केला. वैद्य नावाच्या सारंगी वादकाकडून ते सारंगी शिकले. रात्रीच्या निरव शांततेत ते सारंगी वाजवीत असत. कधी किंगरी बनवूनही रात्री त्यांनी वाजविली आहे. त्यांनी लंडनहून शिवतरकरांना गडकऱ्यांची नाटके पाठविण्यासाठी दोन पत्रे लिहिली आहेत. लहानपणी कीर्तनांमधून त्यांनी तबलाही वाजवला आहे. संगीतामुळे नवजीवन निर्माण होते असे ते म्हणत.