Research indexJournal article
सवततरयपरव कळतल नवडक महलच सतरसघटन आण सतरसधरणवषयक पऊल
आचार्य
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)5 Oct 2024Open access
NobleIDark:/48914/w1/20260525/EF8D9595DOI10.5281/zenodo.13856736
सवततरयपरव कळतल नवडक महलच सतरसघटन आण सतरसधरणवषयक पऊल
आचार्य · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2024
NobleIDark:/48914/w1/20260525/EF8D9595DOI10.5281/zenodo.13856736
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
गोषवारा भारतीय स्त्रियांच्या जीवनात एकोणिसावे शतक अनेक घडामोडींनी भरलेले आणि भारलेले दिसते. स्त्रीजीवनाच्या परिवर्तनाची नांदी असेही यास म्हणता येईल. महाराष्ट्रापुरते जरी बोलायचे झाले तर विशेष करून एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा संपूर्ण कालखंडच स्त्रीसंघटन आणि स्त्रीसुधारणा या घटकांसाठी उपयुक्त ठरलेला दिसतो. स्त्रीला आपल्या अस्मितेची झालेली जाणीव, त्यातून तिने घेतलेला आत्मशोध, तिची खडतर वाटचाल, त्यातून तिचे जागे झालेले आत्मभान थोडक्यात तिचा हा आत्मभानाच्या वाटेवरचा प्रवास तिची विविध क्षेत्रातील उंची दाखविणारा ठरला आहे. आत्मभान जागे झालेल्या स्त्रियांनी एकत्रित येऊन आयोजित केलेल्या परिषदा असो किंवा चालविलेल्या नियतकालिकांतून केलेले साहित्यिक कार्य असो, समाजासमोर आपले विचार प्रभावीपणे मांडणारे एक शक्तिशाली व्यासपीठ त्यांनी उभे केले आणि त्या माध्यमातून त्या समाजासमोर ठामपणे उभ्या राहत इतर स्त्रियांचे प्रतिनिधित्व करू लागल्या. स्वातंत्र्य हे आपल्यासाठीही आहे याची पुसटशीही जाणीव नसणाऱ्या स्त्रियांना संघटित करणे ही सोपी गोष्ट नव्हती. पुरुषगट दूरच पण ज्यांच्यासाठी हा अट्टाहास सुरू होता त्याच स्त्रीवर्गाने त्यांना प्रखर विरोध केला. असंख्य अडचणींना तोंड देत त्यांनी या वर्गाचे प्रतिनिधित्व करीत समाजासमोर एक आदर्श उभा केला. ही तिची वाटचाल पुढच्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरली. संघटनात्मक कार्याची ही पायाभरणी होती. स्त्रीसुधारणांना गतिमान करण्याचे हे कार्य अलौकिक होते जे अशा असंख्य स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वामुळे शक्य झाले.