Research indexBook chapter
ड. बबसहब आबडकर यच सतर वषयक वचर
मेलगेपाटील, सुरवसे
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)14 Apr 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260523/17B9A9B6DOI10.5281/zenodo.15469936
ड. बबसहब आबडकर यच सतर वषयक वचर
मेलगेपाटील, सुरवसे · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260523/17B9A9B6DOI10.5281/zenodo.15469936
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रस्तावना " तिरस्करणीय गुलामगिरी अन अमानुष अन्यायाच्या गरजेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्माला आलो त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात मी अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घालीन" अशी प्रतिज्ञा करून आपले संपूर्ण आयुष्य ज्यांनी अमानुष रूढी, परंपरा नष्ट करून माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळावी यासाठी खर्च केले असे एकमेवद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे विश्वरत्न,महामानव, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. 14 एप्रिल 1891 मध्ये या पृथ्वीतलावर भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला जन्मतःच अठरा विश्व दारिद्र्य घेऊन जन्माला आलेल्या डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे आज मात्र करोडो लोकांचे दारिद्र्य हे कायमचे संपुष्टात आले आहे वयाच्या सहाव्या वर्षी आपली आई भिमाबाईला गमावलेल्या भीमरावाला आईचे महत्व अगदी लहान वयातच उमगलेले होते. भारताला मिळालेली देणगी म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय." सिम्बॉल ऑफ नॉलेज" म्हणून ज्यांना जगभरात ओळखले जाते. असे बाबासाहेब आंबेडकर खरंच मानवजातीच्या कल्याणासाठीच जणू जन्माला आले होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याची प्रचिती त्यांनी स्वकर्तृत्वाने जगाला दाखवून दिली. उच्चविद्याविभूषित, अर्थकारणी, राजकारणी सामाजिक क्रांतिकारक शिक्षणतज्ञ,दलितांचे कैवारी, स्त्रियांचा मुक्तिदाता म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय. देशातील दलितांना, स्त्रियांना ज्या सामाजिक व्यवस्थेने पंगू बनवले होते अशा व्यवस्थेमध्ये दलितांना, स्त्रियांना सबळ, सक्षम करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. स्त्री मुक्ती चळवळीला गतिमान करण्यासाठी त्यांनी भगवान बुद्ध, संत कबीर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानले.