NobleBlocks

From the research index

The paper comes from the research index. It wasn’t submitted here.

Journal article

रषटरपत म. गध : रषटर नरमणतल भमक

प्रा. डॉ. सोनवणे जी. एन.

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)27 Oct 2023Open access

Abstract

No PDF here

The full text is at the publisher

You can read the abstract here, or open it at the publisher.

Read at the publisher

म.गांधी हे आज जागतिक स्तरावरील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शांतता, सत्य, अहिंसा या मार्गावर जग मार्गक्रमण करीत आहे. भारताच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या विचारधारेमध्ये केवळ राष्ट्र आणि राष्ट्र निर्माणाचाच संदेश मिळतो. आदर्श राष्ट्र, आदर्श समाज निर्माण करण्यासाठी ग्राम राज्याची कल्पना सांगितलेली सर्वश्रुत आहे. ग्रामव्यवस्था उत्तमप्रकारे ठेऊन स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था प्रत्येक खेड्यात निर्माण झाली तरच संपूर्ण समाज आदर्श समाज होऊ शकेल, अशी त्यांची धारणा होती. महात्मा गांधीजी आदर्श समाजाच्या क्लपनेला रामराज्य म्हणून संबोधले. त्यालाच 'ग्रामराज्य', 'आदर्श राज्य' असेही म्हणतात. त्यांच्या ग्रामराज्याच्या विचारांचा केंद्रबिंदू खेडे हा होता. महात्मा गांधीजींनी रामराज्यात राज्यविहीन आदर्श समाज अपेक्षित होता. देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी राहील, सहकार्य हा त्यांचा आधार असेल, लोक शांतीपूर्ण गौरवशाली जीवन व्यतीत करतील असा ग्राम गांधींना उभा करायचा होता आणि तो ग्राम हा स्वयंपूर्ण असला पाहिजे असे गांधीजींचे मत होते. अशा ग्रामातूनच गौरवशाली भारत उभा करण्याचे गांधीजींचे स्वप्न होते. अशाप्रकारे गौरवशाली भारताचे स्वप्न गांधीजींच्या विचारातूनच पूर्ण होणारे होते. या दृष्टिकोनातून त्यांच्या सामाजिक विचारसरणीवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने प्रस्तुत शोधनिबंधाची दिशा ठरविण्यात आली आहे.

Identifiers

Discussion

Citations

Topics

Details

Published
27 Oct 2023
Publisher
European Organization for Nuclear Research
Language
MR

More

Suggest a correction or report