NobleBlocks

Research indexJournal article

महतम गध यच गरमवकस वषयक वचर : एक अभयस

एन.

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)28 Oct 2023Open access

NobleIDark:/48914/w1/20260521/A7891DA2DOI10.5281/zenodo.10285680

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

महात्मा गांधीजी कर्ते सुधारक होते. त्यांनी जगाला सत्य व अहिंसेचा मार्ग दाखविला. भारताची जडणघडण करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिलेले आहे. त्यामुळेच त्यांना आदराने राष्ट्रपिता संबोधले जाते. भारत हा खेड्यांचा देश आहे असे भारतभ्रमण केल्यानंतर गांधीजींचे मत झाले होते. त्यामुळे खेडयांचा विकास झाल्याशिवाय भारताचा विकास होणार नाही हे त्यांनी ओळखले. महात्मा गांधीजींनी मांडलेल्या ग्राम स्वराज्याच्या किंवा ग्रामराज्याच्या तत्वज्ञानामध्ये खेड्यांच्या सर्वांगीण विकासाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण व शांतताप्रिय झाले तर बाहेरील मदतीची त्याला काहीच आवश्यकता वाटणार नाही. महात्मा गांधीजीच्या विचारांमध्ये ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेला महत्वाचे स्थान आहे. गांधीजीच्या असा विश्वास होता की, राज्यसत्ता, अर्थसत्ता व समानसत्ता यांचे प्रत्येक गावात एकमत झाले तर ग्रामराज्यच नव्हे तर रामराज्य देखील निर्माण होवू शकेल. महात्मा गांधीजींच्या मते, खरा भारत गावांमध्ये आहे. गावामध्ये जोपर्यंत शहरासारख्या सुविधा विकसित केल्या जाणार नाहीत तोपर्यंत समग्र भारताचा विकास होणार नाही. ग्रामीण भाग हा केवळ राजकीय सत्तेचे केंद्र न बनता अर्थकारणाचे व समाजकारणाचे देखील केंद्र बनले पाहिजे यावर गांधीजी ठाम होते. गांधीजीच्या ग्रामराज्याच्या तत्वज्ञानात ग्रामीण विकासाची कल्पना समाविष्ट झालेली आहे. अर्थात स्थलकाल परिस्थितीनुसार ग्रामीण विकासाची संकल्पना सतत विस्तारत जात असल्यामुळे तिचा अनेक दृष्टीकोनातून अभ्यास करणे महत्वाचे ठरते. ग्रामीण भागातील परिस्थितीत सुधारणा व्हावी, त्यांचा विकास व्हावा, खेडयातील जीवनदेखील सुखकर व्हावे याकरिता म. गांधींनी स्वत: बऱ्याच योजना आखल्या होत्या. म. गांधीजींच्या मते, केवळ शहरांचा किंवा नगरांचा विकास म्हणजे भारत देशाचा विकास नव्हे तर जोपर्यत भारतातील खेड्यांचा किंवा ग्रामीण भागाचा विकास होत नाही तोपर्यत भारताचा आर्थिक विकास होणार नाही. ग्रामीण भागात शेती व्यवसाय नव्हे तर अनेक पारंपारिक लहान उद्योग व्यवसाय देखील संकटात आले आहेत तर काही काळाच्या ओघात संपले आहेत. ग्रामीण भागातील विविध समस्या यासाठी कारणीभूत आहेत. म.गांधी यांचे ग्रामविकास विषयक विचार अभ्यासणे त्यामुळेच महत्त्वाचे ठरते.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report