Research indexJournal article
भरततल मनसक तण-तणव आण आतमहततय: एक दषटकषप
Talekar
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 May 2024Open access
NobleIDark:/48914/w1/20260525/09174C28DOI10.5281/zenodo.12224605
भरततल मनसक तण-तणव आण आतमहततय: एक दषटकषप
Talekar · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2024
NobleIDark:/48914/w1/20260525/09174C28DOI10.5281/zenodo.12224605
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
आत्महत्या ही एक जागतिक घटना आहे. गेल्या काही वर्षांत आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दर ४० सेकंदांनी एक व्यक्ती आत्महत्त्या करते. दरवर्षी सुमारे आठ लाख लोक आत्महत्त्या करतात. यामध्ये १,३५,००० (१७%) इतक्या आत्महत्या भारतीयांच्या आहेत. भारतातील आत्महत्या मृत्यू दर १,००,००० लोकसंख्येमागे १६.३ (जागतिक सरासरी १०.६ च्या तुलनेत) इतके आहे. देशांतर्गत आत्महत्या करणाऱ्या राज्यांची आकडेवारी पाहता ११.९% घटना नोंदीसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण (NMHS) २०१६ नुसार, मानसिक आरोग्य सेवेसाठी उपचारांमधील अंतर चिंताजनक आहे, जे की त्याचे प्रमाण भारतात ८०% पेक्षा जास्त आहे. गेल्या दशकाच्या तुलनेत हे सुधारत आहे परंतु हे अंतर कायम आहे. क्षणिक किंवा सतत सतावणारी समस्या आत्महत्येसाठी कारणीभूत असू शकते. तसेच व्यक्तीचे सामाजीकरण, सामाजिक-आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक समस्या, व्यसन, व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, नातेसंबंधाच्या समस्या, कौटुंबिक गतिशीलता, नैराश्य, शारीरिक व मानसिक आजार अशी अनेक कारणे आत्महत्या करण्यामागे असू शकतात. मानसिक ताण-तणाव आणि आत्महत्या या दोन गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. मानसिक तणावाखाली गेलेल्या व्यक्तीची अखेरची पायरी आत्महत्येच्या दिशेनेच जाते, दररोजचे वर्तमानपत्र उघडा किंवा वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पहा, तुम्हाला आत्महत्येची एक तरी बातमी वाचायला किंव्हा ऐकायला मिळेल. आत्महत्येचा विचार म्हणजे, तात्पुरती मानसिक अवस्था आहे. अशा वेळी त्या व्यक्तीला आधाराची गरज असते. मानसिक आरोग्य सेवा ही काळाची गरज आहे. गेल्या काही वर्षांत कुटुंबातील, मित्रांतील, आप्तेष्टांतील संवाद कमी होत असून, अपुऱ्या संवादामुळे नैराश्य वाढत असलेल्या रुग्णांमध्ये सध्या वाढ होत आहे. १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून आपण साजरा करतो. आत्महत्येपासून व्यक्तीला परावृत्त करणे महत्त्वाचे असून, आत्महत्येतील प्रकार लक्षात घेण्याची गरज असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. भारत सरकारने २०१७ मध्ये मेंटल हेल्थकेअर कायदा (MHCA) पास केला आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. सदर शोध निबंधामध्ये भारतातील मानसिक ताण-तणाव आणि आत्महत्त्या या विषयावर एक दृष्टीक्षेप टाकण्याचा प्रयत्न केला आहे.