NobleBlocks

Research indexJournal article

ड. बबसहब आबडकर यच भरतय लकशह वषयक वचर

Talekar

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 May 2024Open access

NobleIDark:/48914/w1/20260516/362EB522DOI10.5281/zenodo.12180403

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

आधुनिक भारताच्या जडणघडणीत अत्यंत मोलाचे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. आपले संपुर्ण आयुष्य अस्पृश्य समाजाच्या सेवेसाठी झिजवले. प्रतिगामी परंपरेबरोबर आयुष्यभर संघर्ष केला. शतकानुशतके मृतवत पडलेल्या अस्पृश्य समाज त्यांनी जागा केला. या समाजाला माणुसकीची वागणूक मिळावी म्हणून संघर्षासाठी समर्थ बनविले. दलित, पददलितांबरोबर सवर्ण समाजालाही मानवतेच्या दृष्टीने सिद्ध होण्याचे आवाहन केले होते. भारतीय राज्यघटनेत त्यांनी केलेल्या तरतुदी याची साक्ष मानली पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यावर त्यांची अढळ श्रध्दा होती. जातीविहिन समाजरचना हे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी समतानिष्ठ आणि शोषण मुक्त समाज निर्माण करणारी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. चरित्रकार धनंजय कीर यांच्या मते, "नवभारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, लोकशाहीचे त्राते (तारणारे अथवा रक्षण करणारे) आणि मानवी स्वातंत्र्याचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक महान पर्व आहे. मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासातील ते एक सोनेरी पाने आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विसंबून राहून जो गाढ तपश्चर्येतेने, अलौकिक धैर्याने नि अखंड उद्योगशीलतेने उच्च ध्येयासाठी अविरत झगडतो, तो धुळीतून धुरंधरांच्या मालिकेत शिरून कसा विराजमान होतो हे सिद्ध करणारे डॉ. आंबेडकरांसारखे उदाहरण आधुनिक भारतात सापडणे कठीण आहे.”१ प्रस्तुत शोधनिबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संसदीय लोकशाही विषयक विचारांचे अध्ययन करण्यासाठी निवडण्यात आलेला आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report