Research indexBook chapter
रतनगर जलहयतल ससकतक वरस सथळबबत परयटकचय समधन पतळच अभयस
Rajendra S. Bhalerao
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)2 Mar 2024Open access
NobleIDark:/48914/w1/20260521/608AE72FDOI10.5281/zenodo.11071241
रतनगर जलहयतल ससकतक वरस सथळबबत परयटकचय समधन पतळच अभयस
Rajendra S. Bhalerao · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2024
NobleIDark:/48914/w1/20260521/608AE72FDOI10.5281/zenodo.11071241
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
सारांश: पर्यटन हे वेगाने वाढणारे व विकसित होणारे सेवा क्षेत्र आहे सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत जागतिक पर्यटनात अनेक अमुलाग्र बदल घडले आहेत. रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील कोकण विभागात असून, प्रदेशानुसार भौगोलिक रचनेनुसार रत्नागिरीला वेगळेपण आहेच परंतु त्याबरोबरच ऐतिहासिक, नैसर्गिक, सांस्कृतिक वारसा देखील रत्नागिरी जिल्ह्याला लाभला आहे. सण-उत्सव, संस्कृती, परंपरा, खाद्य संस्कृती, लोककला याबरोबरच विविध मंदिरे, कातळ शिल्पे व अनेक थोर क्रांतिकारकांचे योगदान यांचा इतिहास रत्नागिरी जिल्ह्याला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांची मूळ जीवन पद्धती पर्यावरण पूरक आणि संस्कृतीचे जतन करणारी असल्याने त्याचाच वारसा रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे. वारसा पर्यटनाच्या निमित्ताने त्याचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. रत्नागिरीतील कातळ शिल्पांची दखल युनेस्कोने घेतली आहे. परंतु अशा सांस्कृतिक ऐतिहासिक नैसर्गिक घटकांचे जतन करताना येणारी आव्हाने व समस्या समजून घेणे गरजेचे आहे. तसेच येणाऱ्या पर्यटकांचा वारसा पर्यटनाच्या ठिकाणाबद्दलचा कल लक्षात घेणे, त्यांची समाधान पातळी अभ्यासणे आवश्यक आहे ही समाधान पातळी लक्षात आली तर त्यावर उपाययोजना करून पर्यटन संख्या वाढवणे व पर्यटन स्थळांचे संवर्धन करणे वारसा पर्यटनाची शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी उपयोगाचे ठरेल. विविध अशासकीय संस्थांपर्यंत ही माहिती पोहोचवणे व त्यातून वारसा पर्यटन विकास साधणे हा या अभ्यासाचा उद्देश आहे.