Research indexBook chapter
ड. बबसहब आबडकरन सगतलल कटब नयजनच महततव
गायकवाड
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)14 Apr 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260525/9E325C00DOI10.5281/zenodo.15461149
ड. बबसहब आबडकरन सगतलल कटब नयजनच महततव
गायकवाड · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260525/9E325C00DOI10.5281/zenodo.15461149
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
प्रस्तावना स्त्रीमुक्तीचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रिया बद्दल अपार सहानुभूती होते कुटुंबात स्त्रियांचे हाल कमी व्हावेत म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल मध्ये स्त्रियांना विवाह करण्याचा अधिकार व आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला तसेच घटस्फोट दत्तक घेण्याचा अधिकार दिला पोटगी व पुनर्विवाह याचाही अधिकार दिला त्याचप्रमाणे ओडिलोपार्जित संपत्ती मध्ये वारसा हक्क मिळवून दिला त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीमुक्तीच्या संदर्भात कुटुंब नियोजनाचा विचार तितकाच प्रकर्षाने केला आहे तो त्यांचा दृष्टिकोन म्हणजेच स्त्रियांच्या विकासाचा स्त्री शक्तीचा विचार करणार होता दिनांक १२ डिसेंबर १९३८ रोजी मुंबई येथे विद्यार्थी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ते कुटुंब नियोजनाचे पुरुष करता नव्हे तर स्त्रियांना सुद्धा त्याची जबाबदारी ओळखली पाहिजे.’’१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ स्त्रियांनाच उद्देशून बोलतात असे नव्हे तर ते पुरुषांनाही कुटुंब नियोजनाच्या संदर्भात बोलतात. ते म्हणतात “कुटुंब नियोजनाची जबाबदारी स्त्री - पुरुष दोघांची आहे.’’२ कारण कुटुंब नियोजन ही केवळ एक स्त्रीची किंवा एका पुरुषाचे ही एकाची जबाबदारी नसून दोघांचीही जबाबदारी आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले मत नमूद करतात. कारण प्रत्येक वेळेस स्त्रीलाच ती जबाबदारी घ्यायला लावून स्त्रीच्या शरीराची होणारी हानी व तिच्यात येणारी कमजोरी टाळण्यासाठी ती पुरुषांची ही जबाबदारी आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तसेच आपली चौदा भावंडे व दारिद्र्य यावर बोलून एक दोन मुलांचे संगोपन चांगल्या प्रकारे करू शकले शकतो त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्हा तुम्हाला चौदा पोरे झाली तर त्या पोराचे काय करणार त्यांची जबाबदारी समाजावर टाकणार, त्यांचा चांगला विचार कराल, तुम्ही संन्यास घ्यावयास तयार नसाल पण त्यातूनही कोणी घेतला तर फारच चांगले.’’३ कारण लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या उपाययोजना अवलंब करून कुटुंब नियोजन होणे महत्त्वाचे मानतात.