Research indexJournal article
सतरवद लखन करणऱय लखकच अभवयकत व समजकत
भुजंग
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)3 Oct 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260516/A60E0CFBDOI10.5281/zenodo.17260187
सतरवद लखन करणऱय लखकच अभवयकत व समजकत
भुजंग · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260516/A60E0CFBDOI10.5281/zenodo.17260187
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
हा शोधनिबंध मराठीतील स्त्रीवादी लेखिकांची अभिव्यक्ती आणि सामाजिकता यांचा मागोवा घेतो. स्त्रीकेंद्री अनुभवविश्व, लैंगिक जाणिवा आणि पितृसत्तेतील दडपशाहीवर केंद्रित असलेले हे लेखन स्त्रीला समान हक्क व सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या दिशेने कार्यरत आहे. लेखिका समाजातील रूढी व दुहेरी मानके उघड करून स्त्री-पुरुष संबंधांचे वास्तव मांडतात. स्त्रीवाद केवळ विचारप्रणाली नसून तो समाजपरिवर्तनाचा राजकीय प्रयत्न आहे.एकोणिसाव्या शतकातील रमाबाई रानडे (आमच्या आयुष्यातील आठवणी) आणि ताराबाई शिंदे (स्त्री-पुरुष तुलना) यांच्या लेखनापासून ते साठोत्तरी कालखंडातील कवयित्रींच्या (अनुराधा पाटील, नीरजा) लेखनापर्यंतचा आढावा घेतला आहे. याशिवाय, हरिभाऊ आपटे आणि वा. म. जोशी यांच्या कादंबऱ्यांतील तसेच गडकरींसारख्या नाटककारांच्या साहित्यातील स्त्री-सुधारणेच्या कल्पना आणि त्यांच्या मर्यादा तपासल्या आहेत. आधुनिक काळात ‘नारी समता मंच’ मार्फत स्त्रियांच्या निवारा, आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक स्तरावरील मागण्या या चळवळीचा पुढचा टप्पा दर्शवतात, ज्यातून लिंगभेदरहित कायदे आणि स्वतंत्र स्त्री-अस्तित्वाची मागणी अधोरेखित होते.