NobleBlocks

Research indexJournal article

मबई उचच नययलयचय कलहपर खडपठच मगण व आवशयकत

क्षीरसागर

Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Sep 2025Open access

NobleIDark:/48914/w1/20260525/07A556B4DOI10.5281/zenodo.17708369

Free to read at the publisher

You can read the abstract here, or the full text at the publisher.

Read at the publisher

Abstract

‘मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाची आवश्यकता आहे की नाही?’ या समस्येचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न प्रस्तुत शोध निबंधात केला आहे. कोल्हापूर खंडपीठाची मागणी वैद्य आहे की नाही याची केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीचा ऐतिहासिक आढावा घेणे, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीचे स्वरूप स्पष्ट करणे व मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेची आवश्यकता तपासून शिफारशी सुचविणे, ही या संशोधनाची उद्दिष्ठे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाची मागणीला दीर्घ ऐतिहासिक संदर्भ आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाची मागणी रास्त आहे व मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेची आवश्यकता आहे या गृहीतकाच्या आधारे प्रस्थूत मांडणी केली आहे. संशोधनासाठी ऐतिहासिक, तुलनात्मक व विश्लेषणात्मक संशोधन पद्धतींचा अवलंब केला आहे. व्दितीय माहिती स्त्रोतांतर्गत वर्तमान पत्रे व अनुषंगिक वेबसाईटच्या आधारे संशोधन कार्य केले आहे. प्रस्तुत संशोधन कार्य मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाची मागणी व त्याच्या स्थापनेच्या आवश्यकता यापुरते मर्यादित आहे. कायदेशीर आधार, ऐतिहासिक आधार, लोकसंख्या व क्षेत्रफळ, अंतर व वेळ, भौगोलिक स्थान व खर्च, प्रलंबित खटल्यांची स्थिती व ई-न्यायालय या मापदंडाच्या आधारे मागणीची वैद्यता व स्थापनेची आवश्यकता तपासली आहे. प्रस्तुत संशोधन कार्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीचा इतिहास समजून घेण्यास साह्य होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेचा कायदेशीर व इतर आधार समजून घेता येईल. एकंदरीत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीची वैद्यता व आवश्यकता समजून घेता येईल.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report