Research indexJournal article
भरतय सवधनच ७५ वरष आण मलभत हकक
पाटील
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)30 Sep 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260525/1C988BC7DOI10.5281/zenodo.17721100
भरतय सवधनच ७५ वरष आण मलभत हकक
पाटील · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260525/1C988BC7DOI10.5281/zenodo.17721100
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
भारतीय संविधानाचा ७५ वर्षांचा प्रवास हा समाजाच्या बदलत्या गरजांनुसार विकसित होणारा सजीव दस्तऐवज आहे. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हे लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहेत तसेच भारतीय लोकशाहीचा पाया आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा आधारस्तंभ आहेत. गेल्या ७५ वर्षात मूलभूत हक्कांनी देशाच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संसद मूलभूत हक्क कमी करू शकते परंतु संविधानाच्या मूळ स्वरूपात बदल करू शकत नाही. मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास नागरिक भेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. त्यामुळे ते राज्यसत्तेच्या गैरवापराविरुद्धचे एक शक्तिशाली साधन बनले आहे. संविधानानुसार न्यायालयाने अनेक निर्णयांद्वारे मूलभूत हक्कांचे रक्षण करण्याचे कार्य केले आहे. मूलभूत हक्कांच्या संविधानातील अर्थाला न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून व्यापक स्वरूप आलेले दिसते. समाजातील असमानता आणि भेदभावाची दरी पाहता मूलभूत हक्कांसमोरील आव्हानांमध्ये वाढ होत चाललेली आहे मात्र नागरिकांना संविधान व मूलभूत हक्क यांचाच मोठा आधार आहे. संविधान किंवा राज्यघटना म्हणजेच देशाचा सर्वोच्च कायदा होय. याच्याच आधारे देशाचा कारभार चालतो यामध्ये सरकारची रचना, अधिकार आणि कर्तव्ये तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांचा समावेश असतो. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नाहीत तर ते लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहेत. भारतीय संविधानाच्या भाग ३ मध्ये कलम १२ ते कलम ३५ मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. हे हक्क केवळ कायद्याचे कलम नसून ते भारतीय लोकशाहीचा पाया आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा आधारस्तंभ आहेत. मूलभूत हक्क हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या स्वातंत्र्याची आणि समानतेची हमी देतात. या हक्कांचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे ते राज्यसंस्थेच्या मनमानी अधिकारांवर मर्यादा घालतात. संविधान निर्माणकर्त्यांनी हे सुनिश्चत केले की सरकार कितीही शक्तिशाली असले तरी ते नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेऊ शकत नाही.