Research indexJournal article
मलभत करतवय आण सवधनक नतकत: भरततल हकक व जबबदऱयमधल दरच समजक-कयदशर अभयस
Paunikar
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 Dec 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260525/D06F4E56DOI10.5281/zenodo.18128789
मलभत करतवय आण सवधनक नतकत: भरततल हकक व जबबदऱयमधल दरच समजक-कयदशर अभयस
Paunikar · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260525/D06F4E56DOI10.5281/zenodo.18128789
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
भारतीय संविधान नागरिकांना राज्यसत्तेच्या संभाव्य दुरुपयोगापासून संरक्षण करते तसेच स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूलभूत मूल्यान्चे संवर्धन करण्यासाठी हक्कांची व्यापक आणि सुदृढ चौकट प्रदान करते. परंतु, १९७६ मध्ये ४२व्या घटनादुरुस्तीद्वारे अंतर्भूत केलेली मूलभूत कर्तव्यांची संकल्पना तुलनेतली अल्पविकसित राहिली असून, तिच्या व्यवहार्य अंमलबजावणीत अपेक्षित गती आणि गांभीर्य दिसत नाही. नागरिक हक्कांवर प्रखरपणे भर देतात, तर कर्तव्यांच्या स्वीकारण्यात एकूणच उदासीनता जाणवते. हक्क–कर्तव्यांतील हे विसंगत संतुलन भारताच्या लोकशाही संरचनेसाठी आणि सामाजिक विकास प्रक्रियेसाठी एक गंभीर आव्हान निर्माण करते. हा शोधनिबंध या संरचनात्मक असमतोलाच्या सामाजिक-कायदेशीर विश्लेषणाला केंद्रस्थानी ठेवतो. मूलभूत कर्तव्यांची संवैधानिक उत्क्रांती, ऐतिहासिक वैधता आणि विविध आयोगांनी केलेल्या शिफारसींचा सखोल आढावा प्रस्तुत केला आहे. तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांनी कर्तव्यांच्या तात्त्विक व व्यावहारिक महत्त्वाबद्दल व्यक्त केलेल्या न्यायवैज्ञानिक दृष्टिकोनाचे चिंतनशील परीक्षण करण्यात आले आहे. सार्वजनिक जागरूकता, नागरिक वर्तन, शैक्षणिक संरचना आणि सामाजिक संस्थांमधील कर्तव्यसमज यांचे समाजशास्त्रीय मूल्यमापनही या अभ्यासाचा अविभाज्य भाग आहे.गुणात्मक (Qualitative) आणि सैद्धांतिक (Doctrinal) संशोधन पद्धतींच्या साहाय्याने हा प्रबंध कायदेशीर विश्लेषण, सामाजिक अंतर्दृष्टी आणि परिवर्तनशील राज्य–नागरिक नात्यांचे संतुलित एकत्रीकरण साधतो. या विवेचनाचा केन्द्रीय प्रतिपादन असा आहे की संवैधानिक नीतिमत्ता, उत्तरदायित्व आणि नागरिक धर्म (Civic Virtue) यांवर आधारित हक्क–कर्तव्य समतोल हा सुदृढ व दीर्घायुषी लोकशाहीचा मूलाधार आहे. शेवटी, हा प्रबंध विशद करतो की शैक्षणिक सुधारणा, नागरी शिक्षण, सार्वजनिक सहभाग आणि वैधानिक उपक्रमांच्या माध्यमातून कर्तव्य-केंद्रित नागरिकत्वाची जडणघडण अपरिहार्य आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संवैधानिक आदर्शांच्या प्रभावी साकारासाठी नागरिकांच्या कर्तव्यपालनाची संस्कृती दृढ करणे ही काळाची अनिवार्य गरज आहे.