Research indexJournal article
गरमण भगतल डजटल समवशकतच समजक–आरथक वकसवर हणर परभव : एक वशलषणतमक अभयस
हेरवाडे
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 Dec 2025Open access
NobleIDark:/48914/w1/20260525/D5EF3558DOI10.5281/zenodo.18334208
गरमण भगतल डजटल समवशकतच समजक–आरथक वकसवर हणर परभव : एक वशलषणतमक अभयस
हेरवाडे · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2025
NobleIDark:/48914/w1/20260525/D5EF3558DOI10.5281/zenodo.18334208
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
डिजिटल क्रांतीमुळे शिक्षण, आरोग्य, कृषी, प्रशासन तसेच आर्थिक व्यवहारांच्या कार्यपद्धतींमध्ये मूलभूत आणि व्यापक बदल घडून आले आहेत. तथापि, शहरी व ग्रामीण भागांमध्ये डिजिटल पायाभूत सुविधा, इंटरनेट उपलब्धता, डिजिटल साक्षरता आणि तंत्रज्ञान वापराच्या संधींमध्ये लक्षणीय तफावत आढळून येते. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत संशोधन पेपरचा मुख्य उद्देश ग्रामीण भागांतील डिजिटल समावेशकतेची सद्यस्थिती अभ्यासणे, त्यासमोरील प्रमुख आव्हाने ओळखणे, डिजिटल समावेशकतेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सरकारी उपक्रमांचे विश्लेषण करणे तसेच डिजिटल समावेशकतेचा ग्रामीण समाजाच्या सामाजिक-आर्थिक विकासावर होणारा परिणाम तपासणे हा आहे.या अभ्यासासाठी दुय्यम माहितीचा वापर करण्यात आला असून सरकारी अहवाल, संशोधन लेख, योजना दस्तऐवज आणि सांख्यिकीय माहिती यांच्या आधारे विश्लेषण करण्यात आले आहे. अभ्यासातून असे निदर्शनास येते की डिजिटल समावेशकता ग्रामीण भागांतील शिक्षणाच्या संधी वाढविणे, आरोग्य सेवा सुलभ करणे, कृषी उत्पादकता सुधारणा आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. तथापि, डिजिटल दरी कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकटीकरण, डिजिटल साक्षरतेचा प्रसार आणि स्थानिक गरजांनुसार तंत्रज्ञानाचा विकास आवश्यक आहे. अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे ग्रामीण डिजिटल समावेशकतेसाठी धोरणात्मक उपाय सुचविण्यात आले आहेत.