Research indexJournal article
यव पढवर सशल मडयच परणम
पाटील
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)31 Jan 2026Open access
NobleIDark:/48914/w1/20261006/CC61BCACDOI10.5281/zenodo.19018080
यव पढवर सशल मडयच परणम
पाटील · Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) · 2026
NobleIDark:/48914/w1/20261006/CC61BCACDOI10.5281/zenodo.19018080
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
आजचा युवक हा समाजाचा एक कणखर कणा मानला जातो. युवकांचे वर्तन, विचारसरणी, जीवनशैली तसेच त्यांच्या आवडीनिवडी यांचा एकत्रित परिणाम म्हणजेच युवा संस्कृती होय. आधुनिक काळात युवा पिढीवर सोशल मीडियाचा वाढता प्रभाव ही एक अत्यंत गतिमान आणि गंभीर बाब ठरली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा संस्कृतीचे विविध आधुनिक पैलू समजून घेणे सोपे झाले असले, तरी याच प्रक्रियेत ही पिढी पारंपरिक मूल्ये, नीतिमत्ता आणि सांस्कृतिक परंपरांपासून काही प्रमाणात दुरावताना दिसून येते. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना माहिती, विचार व भावना व्यक्त करण्यासाठी एक व्यापक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे युवकांच्या व्यक्तिमत्त्वावर तसेच त्यांच्या विचारसरणीवर लक्षणीय बदल घडून आले आहेत. सोशल मीडियाशी मोठ्या प्रमाणावर जोडले गेल्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक जीवनशैलीत झालेल्या बदलांचा अभ्यास करणे अत्यावश्यक ठरते. युवा पिढीवर सोशल मीडियाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे परिणाम दिसून येतात. एकीकडे माहितीची सुलभ उपलब्धता, संवादक्षमता आणि सामाजिक जाणीव वाढताना दिसते, तर दुसरीकडे मानसिक तणाव, एकटेपणा, आभासी जीवनाकडे झुकाव आणि मूल्यभ्रंश यांसारख्या समस्या उद्भवताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडिया हे एक शक्तिशाली माध्यम असून त्याचा योग्य आणि विवेकी वापर केल्यास ते सकारात्मक आणि प्रभावी ठरू शकते; परंतु त्याचा गैरवापर झाल्यास तो युवा पिढीसाठी घातक ठरू शकतो.