NobleBlocks

Research indexJournal article

महल लखनत आरथक सवततरय आण वयवसयक ओळख

Kawade

International Journal of Novel Research and Development1 Feb 2026Open access

NobleIDark:/48914/w1/20261105/6E9A8881DOI10.56975/ijnrd.v11i2.312481

Abstract

स्त्री-अस्मितेच्या साहित्यिक अभ्यासात आर्थिक स्वातंत्र्य व व्यवसायिक ओळख हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. महिला लेखनात स्त्रीच्या आर्थिक स्वावलंबनाची गरज, त्यासाठीचे संघर्ष, पितृसत्ताक नियंत्रण, कार्यक्षेत्रातील लैंगिक भेदभाव, तसेच व्यावसायिक ओळख मिळवताना निर्माण होणारे सामाजिक-सांस्कृतिक तणाव या सर्वांचा प्रभावी आढावा मिळतो. या संशोधनात मराठी आणि इंग्रजी साहित्याच्या तुलनात्मक संदर्भातून महिलांच्या आर्थिक स्वायत्ततेचे साहित्यिक प्रतिमान, सामाजिक बदल, आणि सर्जनशीलतेवरील परिणाम यांचे विश्लेषण केले आहे.या संशोधनाचा उद्देश महिला लेखनातील या दोन घटकांचा -आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यवसायिक ओळख — सखोल अभ्यास करणे हा आहे. हे अध्ययन साहित्यिक संदर्भ, स्त्री-अभ्यासातील सिद्धांत, आणि आधुनिक सामाजिक-आर्थिक घटक यांच्या आधारे महिला लेखनातील बदलत्या प्रवाहांचे विश्लेषण करते. यामुळे केवळ महिला लेखकांची ओळख नव्याने समजून घेण्यास मदत होते असे नाही, तर साहित्यविश्वातील स्त्री-अस्तित्व कसे बदलत आहे याचीही स्पष्ट जाण निर्माण होते.भारतीय समाजात स्त्रियांची भूमिका मुख्यतः घरगुती जबाबदाऱ्यांपुरती सीमित होती. आर्थिक निर्णयघेण्याचा अधिकार फारच कमी होता. त्यामुळे त्या साहित्यिक निर्मितीतही आर्थिक स्वायत्तता हा मुद्दा अप्रत्यक्ष किंवा गौण स्वरूपातच दिसतो.

Discussion

More

Suggest a correction or report