Research indexJournal article
“वाचन चळवळ आणि प्रसार ग्रंथालये व वाचक संस्था यांचे आधुनिकीकरण”
राऊत
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology2 Jul 2026Open access
“वाचन चळवळ आणि प्रसार ग्रंथालये व वाचक संस्था यांचे आधुनिकीकरण”
राऊत · International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 2026
Free to read at the publisher
You can read the abstract here, or the full text at the publisher.
Abstract
वाचन ही सहजपणे घडणारी क्रिया असली तरी ते एक कौशल्य आहे. वाचन क्षमता, वाचन कौशल्य जसजसे वाढत जाते. तसतसा वाचनानंद वाढतो. वाचनाचे महत्त्व पटते आणि माणूस प्रगल्भ होतो. आणि यासाठी सदर संशोधनांमध्ये वाचन चळवळीचा प्रसार आणि त्यामध्ये ग्रंथालय व वाचक संस्थांची भूमिका अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी प्रामुख्याने वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.संशोधनासाठी आवश्यक माहिती संकलित करण्यासाठी प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही स्त्रोतांचा वापर करण्यात आला आहे. प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी ग्रंथालयांना भेटी देऊन त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेऊन तेथील ग्रंथपाल आणि वाचक उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली.ते विद्यार्थी कोणत्या प्रकारची पुस्तके वाचतात तसेच कोणत्या विद्यार्थ्यांना कोणती पुस्तके वाचण्यास आवडतात. ते विद्यार्थी वाचन उपक्रमांमध्ये किती प्रमाणात सहभागी होतात. याची माहिती घेतली हे विद्यार्थी कोणत्या विषयाची पुस्तके जास्त प्रमाणात वाचतात. हे जाणून घेतले ग्रंथालयातील आधुनिकीकरणामुळे ग्रंथालयांमध्ये अनेक ई- संसाधने तसेच डिजिटल माध्यमे उपलब्ध आहेत. त्यांचा विद्यार्थी वापर करतात का याची माहिती घेतली दुय्यम माहिती मिळवण्यासाठी विविध संदर्भ ग्रंथ निबंध मासिके वर्तमानपत्रे यांचा अभ्यास करण्यात आला. समाजामध्ये वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. सार्वजनिक ग्रंथालयामध्ये येणाऱ्या वाचकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. सार्वजनिक ग्रंथालयात मोफत सेवा दिली जाते.तेथे शाळेतील विद्यार्थ्यांपासून वृद्धापर्यंतचा वाचक वर्ग येत असतो. त्या प्रकारचे ग्रंथ आणि वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते.तसेच विशेष ग्रंथालय ही विशिष्ट वर्गासाठीच सेवा देतात. भारतीय राष्ट्रीय ग्रंथालय कोलकत्ता याची ही माहिती संशोधनात घेण्यात आली आहे. डॉ. एस.आर रंगनाथन यांच्या पाच सूत्रानुसार प्रत्येक वाचकाला ग्रंथ मिळाला पाहिजे. याचा आढावा घेतला आहे. वाचनाचे कौशल्य, वाचनाचा हेतू, वाचनाचे टप्पे,वाचनाचे प्रकार,वाचनाचे आकलन प्राथमिक व दुय्यम माहिती चा चार्ट यांचा समावेश संशोधनांमध्ये करण्यात आला आहे.संशोधनाचे महत्त्व, व्याप्ती, मर्यादा,वाचनाची संकल्पना तसेच निष्कर्ष स्पष्ट करून वाचन चळवळीच्या प्रसारामध्ये ग्रंथालय व वाचक संस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरते.