Research indexJournal article
गृह विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आरोग्य, कल्याण व सार्वजनिक आरोग्य : उदयोन्मुख आव्हाने व नाविन्यपूर्ण उपाय
रत्नपारखी
31 Aug 2026Open access
NobleIDark:/48914/w1/20261121/19D632CEDOI10.5281/zenodo.24411458
गृह विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आरोग्य, कल्याण व सार्वजनिक आरोग्य : उदयोन्मुख आव्हाने व नाविन्यपूर्ण उपाय
रत्नपारखी · 2026
NobleIDark:/48914/w1/20261121/19D632CEDOI10.5281/zenodo.24411458
Abstract
सारांश भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी निरोगी, पोषित आणि सक्षम मनुष्यबळ ही पूर्वअट आहे. मात्र आज देशासमोर कुपोषण, रक्तक्षय, लठ्ठपणा, मधुमेह व उच्च रक्तदाबासारखे असंसर्गजन्य रोग, मानसिक आरोग्याचे प्रश्न आणि असुरक्षित पाणी-स्वच्छता अशी बहुस्तरीय आव्हाने आहेत. हे संशोधन-पत्र दुय्यम (secondary) माहितीवर आधारित वर्णनात्मक-विश्लेषणात्मक अभ्यास आहे. यात NFHS-5, ICMR-INDIAB, राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७ आणि आयुष्मान भारत, पोषण अभियान, फिट इंडिया, ईट राईट इंडिया यांसारख्या उपक्रमांचा आढावा घेतला आहे. अभ्यासाचा निष्कर्ष असा की, आरोग्य हे केवळ रुग्णालय-केंद्रित नसून कुटुंब-केंद्रित आहे आणि कुटुंबातील आहार, संसाधन-व्यवस्थापन, बालविकास, स्वच्छता व आरोग्य-साक्षरता यांवर अवलंबून आहे. हे सर्व गृहविज्ञान (Home Economics) विषयाच्या कार्यक्षेत्रात येते. म्हणून गृहविज्ञान-आधारित सामुदायिक हस्तक्षेप, भरड धान्य (श्रीअन्न) प्रोत्साहन, डिजिटल आरोग्य-साक्षरता आणि महिला-केंद्रित विस्तार शिक्षण हे विकसित भारताच्या आरोग्य-उद्दिष्टांसाठी प्रभावी व किफायतशीर मार्ग ठरू शकतात.