NobleBlocks

Research indexJournal article

भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यात फिनटेक आणि ई-कॉमर्सची भूमिका

जयस्वाल

31 Aug 2026Open access

NobleIDark:/48914/w1/20261121/32B9A228DOI10.5281/zenodo.24411822

Abstract

सारांश: भारतामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीत मोठे परिवर्तन झाले आहे. फिनटेक (FinTech) आणि ई-कॉमर्स (E-Commerce) हे डिजिटल अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक बनले आहेत. डिजिटल पेमेंट, UPI, मोबाईल बँकिंग, डिजिटल कर्ज, ऑनलाइन विमा, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि डिजिटल सेवा यामुळे ग्राहक, व्यापारी आणि उद्योग यांच्यातील व्यवहार अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक झाले आहेत. UPI ने भारताच्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये UPI द्वारे सुमारे 24,162 कोटी व्यवहार झाले आणि त्यांची एकूण किंमत सुमारे ₹314 लाख कोटी होती. या संशोधन पेपरमध्ये भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विकासात फिनटेक आणि ई-कॉमर्सची भूमिका अभ्यासण्यात आली आहे. संशोधनासाठी दुय्यम माहितीचा वापर करण्यात आला असून RBI, NPCI, भारत सरकार, MeitY आणि इतर अधिकृत अहवालांचा आधार घेण्यात आला आहे. अभ्यासातून असे दिसून येते की फिनटेकने आर्थिक समावेशन, डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवांचा विस्तार करण्यास मदत केली आहे, तर ई-कॉमर्सने बाजारपेठेचा विस्तार, ग्राहकांना विविध पर्याय आणि लघु उद्योजकांना नवीन बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. तथापि, सायबर सुरक्षा, डिजिटल साक्षरता, डेटा गोपनीयता, डिजिटल दरी आणि ऑनलाइन फसवणूक ही महत्त्वाची आव्हाने आहेत.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report