NobleBlocks

Research indexJournal article

विकसित भारताच्या शिक्षण व्यवस्थेत भारतीय ज्ञान परंपराचे योगदान

सोनावणे

31 Oct 2026Open access

NobleIDark:/48914/w1/20261121/CF054FEADOI10.5281/zenodo.24414060

Abstract

सारांश : भारतीय ज्ञान प्रणाली ही भारताच्या समृद्ध बौद्धिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक परंपरेचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. शिक्षण व्यवस्थेत तिचा समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख होण्याबरोबरच नैतिक मूल्ये, चिकित्सक विचार, संशोधनवृत्ती आणि सामाजिक जबाबदारी विकसित करण्याची संधी मिळते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने भारतीय ज्ञान प्रणालीचा शालेय आणि उच्च शिक्षणामध्ये समावेश करणे महत्त्वाचे ठरते. गणित, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, कृषी, पर्यावरण, राज्यव्यवस्था आणि तत्त्वज्ञान यांसारख्या क्षेत्रांतील पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अभ्यास केल्यास शिक्षण अधिक उपयुक्त आणि जीवनाभिमुख बनू शकते. यासाठी संशोधनाधारित अभ्यासक्रम, प्रशिक्षित शिक्षक, स्थानिक भाषांतील संदर्भसाहित्य आणि प्रायोगिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. भारतीय ज्ञान प्रणालीचा अभ्यास करताना वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्धता आणि पुराव्यांवर आधारित मूल्यमापन यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. अशा प्रकारे भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक ज्ञान यांचा समन्वय साधल्यास आत्मनिर्भरता, नवोपक्रम आणि सामाजिक विकासाला चालना मिळून विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या पूर्ततेस हातभार लागू शकतो.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report