Research indexJournal article
अमरावती जिल्ह्यातील कृषी विकासात राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे योगदान : अंमलबजावणी, परिणाम व आव्हानांचे चिकित्सक अध्ययन
चक्रे
31 Oct 2026Open access
NobleIDark:/48914/w1/20261121/419313E2DOI10.5281/zenodo.24414289
अमरावती जिल्ह्यातील कृषी विकासात राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे योगदान : अंमलबजावणी, परिणाम व आव्हानांचे चिकित्सक अध्ययन
चक्रे · 2026
NobleIDark:/48914/w1/20261121/419313E2DOI10.5281/zenodo.24414289
Abstract
सारांश :- भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राला महत्त्वपूर्ण स्थान असून शेतकऱ्यांचे उत्पन्न, रोजगार, अन्नसुरक्षा आणि ग्रामीण विकास यांचा कृषी क्षेत्राच्या प्रगतीशी निकटचा संबंध आहे. कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना अर्थात Rashtriya Krishi Vikas Yojana (RKVY) ही कृषी व कृषी-संलग्न क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीला चालना देणारी महत्त्वाची योजना आहे. RKVY ची सुरुवात 2007-08 मध्ये झाली. 2017-18 पासून ती RKVY-RAFTAAR स्वरूपात आणि 2022-23 पासून RKVY-Cafeteria स्वरूपात राबविली जात आहे. सध्याच्या स्वरूपात सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, पावसावर आधारित क्षेत्र विकास, मृदा आरोग्य, सेंद्रिय शेती, पायाभूत सुविधा, नवोन्मेष आणि कृषी उद्योजकता यांचा समावेश आहे. प्रस्तुत अभ्यासाचा केंद्रबिंदू अमरावती जिल्ह्यातील कृषी विकासातील RKVY ची भूमिका हा आहे. संशोधनासाठी प्राथमिक तसेच दुय्यम माहितीचा वापर करण्यात आला आहे. विशेषतः 2017-18 ते 2024-25 या कालावधीतील अर्थसंकल्पीय तरतूद, सुधारित तरतूद आणि प्रत्यक्ष खर्च यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार आठ वर्षांत अर्थसंकल्पीय तरतूद ₹44,506 कोटी, सुधारित तरतूद ₹41,123 कोटी आणि प्रत्यक्ष खर्च ₹39,766 कोटी राहिला आहे. सुधारित तरतुदीच्या तुलनेत एकूण प्रत्यक्ष खर्च सुमारे 96.70% राहिला आहे. तथापि, 2022-23 मध्ये खर्चाचे प्रमाण 65.18% इतके कमी झाले. यावरून RKVY च्या निधीवापरामध्ये वर्षनिहाय चढ-उतार दिसून येतात.