NobleBlocks

Research indexJournal article

महिलांच्या प्रजनन आरोग्यावर सामाजिक-आर्थिक स्थितीचा होणारा परिणाम : एक अभ्यास

निकोसे

31 Oct 2026Open access

NobleIDark:/48914/w1/20261121/B508945ADOI10.5281/zenodo.24416307

Abstract

सारांश महिलांचे प्रजनन आरोग्य हा सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक विकासाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. सामाजिक-आर्थिक स्थिती मध्ये उत्पन्न, शिक्षण, व्यवसाय आणि राहणीमान यांचा समावेश होतो, तिचा महिलांच्या प्रजनन आरोग्यावर तसेच एकूणच आरोग्य आणि कल्याणावर लक्षणीय प्रभाव पडतो. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील महिलांना अनेकदा आरोग्यसेवांचा मर्यादित लाभ, अपुरे पोषण, अस्वच्छता, लवकर विवाह, प्रजनन आरोग्याविषयी जागरूकतेचा अभाव आणि प्रजनन आरोग्याशी संबंधित विविध समस्यांचा अधिक धोका यांसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागते.या सामाजिक-आर्थिक असमानतेचा महिलांच्या मासिक पाळीच्या आरोग्यावर, प्रजनन क्षमतेवर, गर्भनिरोधक साधनांच्या वापरावर, गर्भधारणेच्या परिणामांवर, मातृत्व आरोग्यावर आणि प्रजनन आरोग्यविषयक सेवांच्या उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम होतो. प्रस्तुत संशोधन लेखामध्ये सामाजिक-आर्थिक स्थिती आणि महिलांचे प्रजनन आरोग्य यांच्यातील संबंधांचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये सामाजिक-आर्थिक स्थितीचे प्रमुख निर्धारक, विविध आव्हाने आणि वंचित समुदायांतील महिलांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक असमानतांवर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच, महिलांचे प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी शिक्षण, आरोग्यसेवांची उपलब्धता, शासकीय योजना आणि सामाजिक जागरूकता यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. या अभ्यासातून असे अधोरेखित होते की, महिलांचे प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी, मातृरुग्णता आणि मातृमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी, प्रजननविषयक अधिकार सुनिश्चित करण्यासाठी तसेच लैंगिक समानता आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारणे, आरोग्यसेवा अधिक सक्षम करणे आणि प्रजनन आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report