Research indexJournal article
बदलत्या जागतिक समाजात भारतीय ज्ञानप्रणालीची प्रासंगिकता
पंडित
31 Oct 2026Open access
NobleIDark:/48914/w1/20261121/297922D3DOI10.5281/zenodo.24416756
बदलत्या जागतिक समाजात भारतीय ज्ञानप्रणालीची प्रासंगिकता
पंडित · 2026
NobleIDark:/48914/w1/20261121/297922D3DOI10.5281/zenodo.24416756
Abstract
सारांश : भारताला समृद्ध ज्ञानप्रणालीचा वारसा लाभलेला आहे. ही ज्ञानप्रणाली भारताच्या प्राचीन आणि समृद्ध बौद्धिक परंपरेचा व्यापक अविष्कार आहे. या प्राचीन ज्ञानाकडे केवळ माहिती किंवा उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता निसर्ग आणि विश्व यांच्यातील परस्पर संबंध समजून घेण्याचे माध्यम म्हणून स्वीकारलेले आहे. प्राचीन भारतीय ज्ञानप्रणालीतील वेद , उपनिषद, योग, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र, व्याकरण, स्थापत्यशास्त्र या ज्ञान परंपरा अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. २१ व्या शतकात जागतिकीकरण, तंत्रज्ञान, AI, औद्योगिकीकरण, डिजिटल क्रांती इत्यादीमुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडून आला आहे. त्यातूनच पर्यावरणीय संकटे, मानसिक ताण, सामाजिक विषमता, विविधांगी संघर्ष यासारखी संकटेही निर्माण झाली आहेत. त्यामुळेच भारतीय ज्ञान प्रणालीतील योग, आयुर्वेद, ध्यान, अहिंसा, करुणा, सह अस्तित्व निसर्गाशी संतुलन, शाश्वत जीवनशैली आणि “वसुधैव कुटुंबकम” यासारख्या संकल्पनांचे नव्याने अध्ययन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या ज्ञानप्रणालीतील परंपरांचा केवळ गौरव न करता वर्तमान काळातील वैज्ञानिक दृष्टिकोनातून करणे तसेच त्याचे पुनर्वाचन करणे हे आवश्यक आहे. प्रस्तुत संशोधन लेखात बदलत्या जागतिक समाजाच्या संदर्भात भारतीय ज्ञानप्रणालीची संकल्पना स्वरूप विविध क्षेत्रातील योगदान आणि त्यांची वर्तमान काळातील प्रासंगिकता इत्यादी बाबींचा अभ्यास करण्यात येणार आहे.