Research indexJournal article
कौशल्य विकास आणि रोजगारक्षमता: भारतातील युवकांसाठी संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा
शेगोकार
31 Oct 2026Open access
NobleIDark:/48914/w1/20261121/BB45E937DOI10.5281/zenodo.24417581
कौशल्य विकास आणि रोजगारक्षमता: भारतातील युवकांसाठी संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा
शेगोकार · 2026
NobleIDark:/48914/w1/20261121/BB45E937DOI10.5281/zenodo.24417581
Abstract
सारांश भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश असून, ही "डेमोग्राफिक डिव्हिडंड" (लोकसंख्या लाभांश) ची स्थिती देशाच्या आर्थिक विकासासाठी एक सुवर्णसंधी आहे. परंतु, पदवीधारक तरुणांमध्ये वाढणारी बेरोजगारी आणि कौशल्य तफावत (Skill Gap) हे एक मोठे आव्हान बनले आहे. . युवकांकडे बाजाराला हवी असलेली कौशल्ये असणे आवश्यक आहे. हे संशोधन कौशल्य विकास आणि रोजगारक्षमता यांतील संबंधाचा अभ्यास करते. स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY), राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यांसारख्या उपक्रमांमुळे संधी वाढल्या आहेत; तरीही औपचारिक प्रशिक्षणाचे कमी प्रमाण, शिक्षण आणि उद्योग यांतील तफावत, ग्रामीण-शहरी दरी, महिलांचा कमी सहभाग आणि प्रशिक्षणाची गुणवत्ता ही आव्हाने कायम आहेत या शोधनिबंधामध्ये भारतातील कौशल्य विकास कार्यक्रमांचे महत्त्व, युवकांसाठी उपलब्ध असणाऱ्या संधी, शिक्षण आणि उद्योगांमधील तफावतीमुळे निर्माण होणारी आव्हाने आणि भविष्यातील रोजगार बाजारपेठेच्या गरजांवर सखोल प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच देशातील युवकांना सक्षम बनवण्यासाठी धोरणात्मक शिफारसी सुचवण्यात आल्या आहेत. कौशल्य विकास, उद्योग-संस्था सहकार्य, प्रत्यक्ष प्रशिक्षण, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, डिजिटल कौशल्ये आणि उद्योजकता यांचा एकत्रित विकास केल्यास युवकांची रोजगारक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. त्यामुळे शिक्षणव्यवस्था आणि रोजगार बाजारपेठ यांच्यात अधिक मजबूत दुवा निर्माण करणे आवश्यक आहे.