NobleBlocks

Research indexJournal article

विकसित भारत २०४७' च्या संदर्भात आदिवासी महिलांचे हक्क व सक्षमीकरण : धोरणात्मक विश्लेषण

भगत

31 Oct 2026Open access

NobleIDark:/48914/w1/20261121/EC3E1A3DDOI10.5281/zenodo.24417723

Abstract

सारांश : भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक रचनेत आदिवासी समुदायाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. भारतीय राज्यघटनेने आदिवासींच्या संरक्षण व विकासासाठी विशेष तरतुदी केल्या असल्या तरी आदिवासी महिलांची स्थिती आजही बहुआयामी वंचिततेने ग्रस्त आहे. लिंगभेद, जमातीची ओळख, भौगोलिक अलगाव, आर्थिक दुर्बलता आणि सामाजिक भेदभाव यांचा एकत्रित परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला दिसून येतो. स्वातंत्र्यानंतर विविध शासकीय धोरणे व योजना राबविल्या गेल्या असल्या तरी शिक्षण, आरोग्य, रोजगार, जमीन व वनसंपत्तीवरील हक्क आणि राजकीय सहभाग या क्षेत्रांत आदिवासी महिलांचे सक्षमीकरण अपेक्षित पातळीवर झालेले नाही. ‘विकसित भारत 2047’ ही संकल्पना समावेशक विकास, सामाजिक न्याय आणि समान संधी यांवर आधारित असली, तरी आदिवासी महिलांचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय ही संकल्पना अपूर्ण ठरते. आदिवासी महिला नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, पारंपरिक ज्ञान आणि उपजीविकेच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्या घटनात्मक, कायदेशीर व धोरणात्मक हक्कांचे प्रभावी संरक्षण आणि अंमलबजावणी आवश्यक आहे. हक्काधिष्ठित विकास दृष्टिकोन स्वीकारून आदिवासी महिलांना विकासाच्या सक्रिय भागीदार म्हणून सक्षम केल्यासच विकसित भारताची संकल्पना सामाजिक न्याय आणि लैंगिक समानतेच्या आधारावर प्रत्यक्षात साकार होऊ शकते.

Discussion

Topics

More

Suggest a correction or report