NobleBlocks

Research indexBook

निबंध लेखन कौशल्य (AEC)

Associate Professor

22 Nov 2026Open access

NobleIDark:/48914/w1/20261122/16B20A4EDOI10.5281/zenodo.24445076

Abstract

लेखन म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नव्हे, तर विचारांची शिस्त आहे. मानवीसंस्कृतीच्या इतिहासात ज्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले, त्यांनीचइतिहास घडवला आहे. आणि विचार मांडण्याचे सर्वात समर्थ, सर्वात प्रभावीमाध्यम म्हणजे निबंध. निबंध हा केवळ परीक्षेतील एक प्रश्न नसून, तो व्यक्तीच्याव्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) ने शिक्षणाला केवळ पदवीपुरते मर्यादितन ठेवता, कौशल्याधिष्ठित केले आहे. यु.जी.सी. व एन.सी.टी.ई. च्या मार्गदर्शकतत्त्वांनुसार महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.ए., एम.ए., बी.एड.,एम.एड., बी.पी.एड., व एम.पी.एड. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमात 'निबंधलेखन कौशल्य' या AEC विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. केवळविद्यापीठीय अभ्यासक्रमासाठीच नव्हे, तर MPSC, NET-SET, CET, TETव इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आणि शालेय शिक्षकांसाठीही निबंध लेखन हे 3 यशाची गुरुकिल्ली ठरले आहे. याच सर्वांगीण गरजेतून या संदर्भ ग्रंथाची निर्मितीझाली आहे.निबंध म्हणजे काय? तर स्व-अनुभव, वाचन, निरीक्षण आणि चिंतन यांच्याआधारे एखाद्या विषयाचे केलेले मुद्देसूद, तार्किक आणि रसाळ विवेचन. आजच्याविद्यार्थ्याकडे माहिती आहे, पण ती मांडण्याचे कौशल्य नाही. भावना आहेत,पण त्याला शब्दांचे रूप नाही. सोशल मीडियाच्या तुकड्या-तुकड्यांच्या भाषेत,सुसंगत, सलग आणि प्रभावी लेखनाची कला लोप पावत चालली आहे. हीचउणीव भरून काढण्यासाठी हा ग्रंथ एक प्रामाणिक प्रयत्न आहे.या ग्रंथाची काहीवैशिष्ट्ये - अभ्यासक्रमाशी सुसंगत:* NEP-2020 च्या उद्दिष्टांनुसार वैचारिक,सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय, वैज्ञानिक, आत्मपर आणि ललित अशा सर्वप्रकारच्या निबंधांचा समावेश. स्पर्धा परीक्षाभिमुख, MPSC, UPSC मध्येविचारले जाणारे निबंध, त्याची मांडणी, प्रस्तावना-समारोपाची तंत्रे, कोटेशन्स,आकडेवारी आणि मुद्द्यांची वैचारिक बैठक यावर विशेष भर. कृती-आधारित,केवळ निबंधांचे नमुने न देता, निबंध कसा लिहावा? त्याची चौकट कशीअसावी? भाषाशैली कशी असावी? याचे शास्त्रीय प्रशिक्षण. विद्यार्थी-केंद्री,अत्यंत सोपी, ओघवती आणि विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेत मांडणी.आम्ही या पुस्तकात निबंधाला केवळ परीक्षेपुरते मर्यादित न ठेवता, त्यालाजीवनाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. कारण चांगला निबंध लिहिणाराविद्यार्थी हा परीक्षेतच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक व्यासपीठावर यशस्वीहोतो.हा ग्रंथ लिहिताना अनेक संदर्भ ग्रंथ, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्याअडचणी यांचा बारकाईने अभ्यास केला आहे. लेखन ही अव्याहत साधना आहे. 4 तरीही हा ग्रंथ विद्यार्थ्यांना लिहिते करेल, विचार करायला लावेल आणि स्वतःचेमत निर्भयपणे मांडण्याचे बळ देईल, याचा आम्हाला विश्वास आहे.हा ग्रंथ साकार होत असताना प्राईम पब्लिशिंग हाऊस, जळगाव चे सर्वेसर्वा श्री.प्रदीप पाटील यांनी जो विश्वास दाखवला आणि सहकार्य केले त्याबद्दल आम्हीत्यांचे ऋणी आहोत.हा ग्रंथ वाचकांच्या हाती देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपल्यासूचना आणि अभिप्रायांचे आम्ही सहर्ष स्वागत करू. लेखन थांबू नये, विचारथांबू नये!

Discussion

More

Suggest a correction or report